Hardik Pandya - Akash Ambani MIpaltan
क्रीडा

Hardik Pandya: शिक्कामोर्तब झालाच! हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये परतला, तर गुजरातला मिळाला नवा कॅप्टन

Hardik Pandya in Mumbai Indians: हार्दिक पंड्या आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स संघात परतला आहे.

Pranali Kodre

Hardik Pandya return to Mumbai Indians for IPL 2024:

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या लिलावापूर्वी मोठा उलटफेर झाल्याचे समोर आले आहे. हार्दिक पंड्याच्या ट्रेडिंगबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली चर्चा अखेर खरी ठरली आहे. हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी झाली आहे.

हार्दिक पंड्याच्या ट्रेडिंगबाबत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या संघांनी अधिकृत घोषणा केली आहे.

मुंबई इंडियन्सने त्यांनी गेल्यावर्षी लिलावात 17.5 कोटी रुपयांना खरेदी केलेला अष्टपैलू क्रिकेटपटू कॅमेरॉन ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ट्रेड केला आहे.

त्याचबरोबर हार्दिक पंड्याला पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सने संघात घेतले आहे. गुजरात टायटन्सने त्यांचा कर्णधार हार्दिकला मुंबईला ट्रेड केले आहे. त्यामुळे गुजरातने आता शुभमन गिलला संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून याबद्दल चर्चा होती. कारण हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने 2022 साली करारमुक्त केल्यानंतर गुजरात टायटन्सने 2022 आयपीएलपूर्वी 15 कोटी रुपयांमध्ये संघात सामील करून घेतले होते. त्यामुळे त्याला संघात पुन्हा घेण्यासाठी मुंबईला 15 कोटी रुपये मोजावे लागणार होते.

मात्र, संघातील खेळाडू मुक्त केल्यानंतरही मुंबईकडे आयपीएल 2024 लिलावासाठी अवघे 15.25 कोटी रुपये शिल्लक होते. त्यामुळे अखेर मुंबईने  ग्रीनला बेंगलोरबरोबर ट्रेड केले आहे. त्यामुळे त्यांच्या पर्समध्ये आणखी 17.5 कोटींची भर पडली आहे. त्यातून त्यांनी 15 कोटी हार्दिकसाठी मोजत त्याला पुन्हा आपल्या संघात घेतले आहे.

दरम्यान, हार्दिक 2022 आणि 2023 हंगामात गुजरातचा कर्णधार होता. त्याने 2022 मध्ये संघाला आयपीएलचे विजेतेपदही जिंकून दिले होते. तसेच आयपीएल 2023 मध्येही त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात अंतिम सामन्यात खेळले, पण त्यांना चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव स्विकारावा लागला.

आता हार्दिक मुंबईमध्ये परतल्याने गुजरातला नवा कर्णधार शोधण्याची गरज होती. अखेर त्यांनी ही जबाबदारी युवा शुभमन गिलकडे सोपवली आहे. गिलने गुजरातकडून गेल्या दोन हंगामात शानदार कामगिरी केली आहे.

हार्दिकची मुंबई संघात घरवापसी

हार्दिकने 2015 साली मुंबई इंडियन्सकडूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी मुंबईने त्याला 10 लाखांच्या किंमतीत संघात संधी दिली होती. त्यानंतर हार्दिक 2021 पर्यंत याच संघाकडून आयपीएलमध्ये खेळला.

तो 2015, 2017, 2019 आणि 2020 साली आयपीएल विजेतेपद मिळवलेल्या मुंबई संघाचाही भाग होता. त्यानंतर 2022 आयपीएलपूर्वी मुंबईने त्याला संघातून करारमुक्त केले होते.

हार्दिकने मुंबई इंडियन्सकडून 2015 ते 2021 दरम्यान 92 सामन्यांमध्ये 1476 धावा केल्या. तसेच 51 विकेट्स घेतल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

SCROLL FOR NEXT