Hardik Pandya is Ready for T20 World Cup Dainik Gomantak
क्रीडा

हार्दिक पंड्या T-20 World Cup साठी सज्ज

हार्दिक पंड्याने गुरुवारी रात्री राजस्थान रॉयल्सविरुद्ध (आरआर) 52 चेंडूत नाबाद 87 धावांची खेळी केली.

दैनिक गोमन्तक

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या मोसमात आपली शानदार लय पुन्हा मिळवली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात त्याने उत्तम कामगिरी केली आहे. अशाप्रकारे, हार्दिक आता यावर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार झाला आहे. हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स (GT) ला 5 पैकी 4 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून दिले आहे. (Hardik Pandya ready for upcoming T-20 world cup)

राजस्थानविरुद्ध हार्दिकची अष्टपैलू कामगिरी
हार्दिक पंड्याने गुरुवारी रात्री राजस्थान रॉयल्सविरुद्ध (आरआर) 52 चेंडूत नाबाद 87 धावांची खेळी केली आणि आपल्या संघ गुजरातला 37 धावांनी मोठा विजय मिळवून दिला. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने 2.3 षटके टाकली आणि 18 धावांत 1 बळीही घेतला.

उर्वरित मोसमातही हार्दिक हिट ठरला
हार्दिकने या मोसमातील पाचही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. हार्दिकने या मोसमात अनुक्रमे 33, 31, 27, 50*, 87* धावा केल्या आहेत. गेल्या दोन डावांत त्याने नाबाद राहताना संघाला विजयापर्यंत नेले. या पाच सामन्यांमध्ये त्याने गोलंदाजी करत 4 बळीही घेतले. या मोसमात हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचा (RR) पराभव केला आहे.

T20 विश्वचषक या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रेलिया (Australia) करणार आहे. वेळापत्रकानुसार टीम इंडियाला (Team India) या स्पर्धेतील पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. 2021 चा शेवटचा T20 विश्वचषक भारताने UAE मध्येच आयोजित केला होता. त्यानंतर टीम इंडिया ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT