Mahika Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Mahika Sharma : हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिकानं दाखवलं आईचं रुप! चिमुकल्या अगस्त्यसाठी गर्दीत बनली 'ढाल' Watch Video

Mahika Sharma Video: मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्याची कथित गर्लफ्रेंड माहिका शर्मा आणि त्याचा मुलगा अगस्त्य यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

Hardik Pandya Girlfriend Mahika Sharma Video: आयपीएल 2026 चा हंगाम केवळ चौकार-षटकारांसाठीच नाही, तर मैदानाबाहेर घडणाऱ्या अनेक व्हायरल क्षणांमुळे चर्चेत येत आहे. पहिल्याच दिवशी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यातील प्रेमळ केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधल्यानंतर आता मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्याची कथित गर्लफ्रेंड माहिका शर्मा आणि त्याचा मुलगा अगस्त्य यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रविवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील रोमांचक सामन्यानंतर हा प्रकार घडला, ज्यामध्ये माहिकाचे अगस्त्यप्रती असलेले प्रेम आणि तिची काळजी पाहून नेटकरी तिचे कौतुक करत आहेत.

वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय मिळवल्यानंतर माहिका शर्मा अगस्त्यचा हात धरुन बाहेर पडत होती. मात्र, त्यांना पाहताच पापाराझींनी फोटो काढण्यासाठी एकच तोबा गर्दी केली. कॅमेऱ्यांच्या फ्लॅशलाईटमुळे अगस्त्य काहीसा अस्वस्थ झाला. हे पाहून माहिका काहीशी संतापलेली दिसली, पण तिने अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. तिने तात्काळ अगस्त्यचा चेहरा आपल्या हाताने झाकला आणि त्याला प्रेमाने मिठीत घेतले, जेणेकरुन फ्लॅशचा त्रास त्याला होणार नाही. पापाराझी मागे हटत नसल्याचे पाहून तिने स्पष्ट शब्दांत सुनावले की, "प्लीज फ्लॅश मारु नका, आम्ही अगस्त्यसोबत आहोत, थोडे बाजूला व्हा."

माहिकाचा हा 'प्रोटेक्टिव्ह' अंदाज पाहून सोशल मीडियावर (Social Media) तिची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा केली जात आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी तिच्या आणि अगस्त्यच्या बॉन्डिंगवर कौतुकाचा वर्षाव केला. एका युजरने लिहिले की, "माहिका एक 'प्युअर सोल' आहे, ती अगस्त्यवर खूप प्रेम करते," तर दुसऱ्याने म्हटले, "माहिका अगदी आईप्रमाणेच त्याची काळजी घेत आहे, अगस्त्यला एक प्रेमळ आणि काळजी घेणारी व्यक्ती मिळाली." अनेकांनी त्यांच्यातील हे घट्ट नाते पाहून समाधान व्यक्त केले.

हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच माहिका आणि अगस्त्यमधील हे प्रेमाचे नाते चाहत्यांना भावले. पापाराझींच्या गराड्यात मुलाला सुरक्षित ठेवणारी माहिका सध्या इंटरनेटवर 'रिअल चॅम्पियन' ठरत आहे. आयपीएलच्या या धावपळीत खेळाडूंच्या कुटुंबीयांचे असे माणुसकी जपणारे क्षण चाहत्यांच्या मनाला स्पर्श करुन जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT