Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL T20 Series: टीम इंडियाला ऋषभ पंतची उणीव भासेल का? हार्दिक म्हणाला...

IND vs SL: पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्याला भारतीय संघात ऋषभ पंत नसल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने प्रथम पंतला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमन्तक

Hardik Pandya On Rishabh Pant: भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या टी-20 मालिकेपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. ही टी-20 मालिका 3 जानेवारी, मंगळवारपासून सुरु होणार आहे. पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्याला भारतीय संघात ऋषभ पंत नसल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने प्रथम पंतला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर, त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियावर (Team India) काय परिणाम होतील याबद्दल तो बोलला.

ऋषभबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला की, “जे घडले ते खूप दुर्दैवी होते. यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, त्याने लवकरात लवकर बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे. आमच्या प्रार्थना त्याच्या पाठीशी आहेत. 'वी' लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत.''

पंतच्या संघातील उपस्थितीबद्दल बोलताना हार्दिक पुढे म्हणाला की, “तो नक्कीच खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. पण आता काय परिस्थिती आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पंत संघात असल्याने खूप फरक पडतो. त्याची अनुपस्थिती अशी गोष्ट आहे, जी आपण नियंत्रित करु शकत नाही." याशिवाय पंतऐवजी ज्या खेळाडूला संघात संधी मिळेल, त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, असेही हार्दिक म्हणाला.

श्रीलंका मालिकेत पंतचा संघात समावेश नव्हता

विशेष म्हणजे, श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 आणि एकदिवसीय मालिकेत पंतला संघाचा भाग बनवण्यात आले नव्हते, मात्र फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंत संघाचा महत्त्वाचा भाग होता. या मालिकेमुळे तंदुरुस्तीवर अधिक काम करण्यासाठी त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत बोलावण्यात आले, त्यामुळे श्रीलंका (Sri Lanka) मालिकेत त्याची निवड झाली नाही. पण या सगळ्यांआधीच त्याच्यासोबत एक दुर्दैवी अपघात झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

Goa Crime: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Film Festival: 'कोकणीतून चित्रपट निर्मितीसाठी पुढे या'! CM सावंतांचे आवाहन; राज्य चित्रपट महोत्सवाचा थाटात समारोप

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

SCROLL FOR NEXT