घड्याळांच्या टॅक्स चूकवेप्रकरणी Hardik Pandya चे स्पष्टीकरण
घड्याळांच्या टॅक्स चूकवेप्रकरणी Hardik Pandya चे स्पष्टीकरण  Dainik Gomantak
क्रीडा

घड्याळांच्या टॅक्स चोरीबाबत हार्दिकचे स्पष्टीकरण,'मी स्वत: शुल्कभरण्यासाठी गेलो'

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) दुबईहून पाच कोटी रुपयांची घड्याळे आणून सीमाशुल्क विभागाने (Customs Department) ही घड्याळे जप्त केल्याचा दावा करण्यात आला. याप्रकरणी आता हार्दिक पांड्याचे वक्तव्य समोर आले आहे. त्याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. घड्याळे (Watches) जप्त करण्यात आलेली नसून तो सीमा शुल्काच्या मूल्यांकनासाठी तेथे गेला होता असे हार्दिकचे म्हणणे आहे. घड्याळांची किंमत पाच कोटी नसून दीड कोटी रुपये असल्याचे त्याने सांगितले आहे. हार्दिकने याबाबत एक निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले आहे.

यामध्ये हार्दिक पांड्याने सांगितले की, मी स्वत: ही घड्याळे सीमाशुल्क विभागाला दिली होती. ती जप्त करण्यात आलेले नाहीत. त्यांनी घड्याळांची बिले व इतर कागदपत्रेही कस्टमला दिली आहेत. घड्याळांची कस्टम ड्युटी भरण्यास मी तयार आहे. मात्र अद्यापपर्यंत वस्तूंचे संपूर्ण मूल्यांकन सीमाशुल्क विभागाने केलेले नाही. 15 नोव्हेंबरला सकाळी दुबईहून आल्यावर मी माझे सामान घेतले आणि स्वतः मुंबई विमानतळावरील कस्टम काउंटरवर जाऊन माझ्या खरेदी केलेल्या वस्तूंची माहिती देत आवश्यक ती कस्टम ड्युटी भरली.

मुंबई विमानतळावरील माझ्या माहितीबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती मांडण्यात आली असून, जे काही घडले ते मला स्पष्ट करायचे आहे. दुबईतून मी कायदेशीर मार्गाने खरेदी केलेल्या मालाची मी स्वतः माहिती दिली आणि जे काही शुल्क असेल ते भरण्यास मी तयार आहे. या वेळी कस्टम विभागाने खरेदीशी संबंधित सर्व कागदपत्रे मागितली आणि ती मी दिली. मात्र, सीमा शुल्क विभाग वस्तूंचे मूल्यमापन करत असून त्यावर जो काही कर असेल तो मी भरेन असे मी आधीच सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

Heavy Rainfall in UAE: मुसळधार पाऊस अन् जोरदार वादळाने UAE पुन्हा बेहाल; उड्डाणे रद्द, इंटरसिटी बस सेवाही ठप्प

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

SCROLL FOR NEXT