Harbhajan Singh  Dainik Gomantak
क्रीडा

SA Vs IND: ''पुजारा आणि राहणेला टीम इंडियातून वगळणं...'', भज्जीने व्यक्त केला संताप

Harbhajan Singh Reaction: पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर आता टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Manish Jadhav

Harbhajan Singh Reaction: पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर आता टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सेंच्युरियन कसोटीत टीम इंडियाने ना म्हणावी तशी फलंदाजी केली ना गोलंदाजी. या कसोटी मालिकेसाठी निवड समितीने संघातील युवा खेळाडूंवर अधिक विश्वास व्यक्त केला आहे. तर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या कसोटी क्रिकेटमधील बड्या खेळाडूंना या मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही. यावर आता टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने संताप व्यक्त केला आहे.

पुजारा-रहाणेच्या वगळण्यावर भज्जीने प्रश्न उपस्थित केला

दरम्यान, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनाही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत स्थान मिळाले नाही. आता आपल्या यूट्यूब चॅनलवर याबद्दल बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, ''रहाणे आणि पुजाराला कसोटी संघातून का वगळण्यात आले हे मला समजत नाही. या दोन्ही खेळाडूंनी संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. जर आपण मागील विक्रमांबद्दल बोललो तर पुजाराने विराट कोहलीइतकेच योगदान दिले आहे. तरीही पुजाराला संघातून वगळण्यात आले जे मला समजू शकत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये पुजारापेक्षा चांगला फलंदाज आपल्याकडे नाही.''

दुसरीकडे, रहाणे आणि पुजारा हे दोघेही 2023 च्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत सहभागी झाले होते. या मालिकेनंतर या दोघांनाही कसोटी संघातून वगळण्यात आले. या दोन्ही खेळाडूंनी परदेशी खेळपट्ट्यांवर भारतीय संघासाठी महत्त्वाच्या प्रसंगी अनेक चमकदार खेळी खेळल्या आहेत. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या मालिकेतून दोन्ही खेळाडूंना वगळणे टीम इंडियावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. सेंच्युरियन कसोटीत ज्या प्रकारे टीम इंडियाच्या विकेट्स सातत्याने पडत होत्या. आता त्याच्याकडे पाहता संघात अनुभवी खेळाडू असणे किती महत्त्वाचे आहे, असे वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy 2025: चार चेंडूंत चार विकेट्स! दुलीप ट्रॉफीत पहिल्यांदाच 'या' खेळाडूने रचला इतिहास; जम्मू काश्मीरचा पठ्ठा चमकला

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; 'यलो अलर्ट' जारी

Boat Accident: स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट उलटली! 49 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता; 17 जणांना वाचवण्यात यश

Duleep Trophy 2025: पुनरागमन ठरलं निष्फळ! दुलीप ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीची निराशाजनक कामगिरी, गोलंदाजीत केलं ‘शतक’

Margao Gangwar: मुंगूल-मडगाव गँगवॉरचे बिश्नोई गँगशी कनेक्शन; कुख्यात गुंड 'ओमसा'ला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT