Chris Gayle  Dainik Gomantak
क्रीडा

Chris Gayle बघतच राहीला... भज्जीने उडवल्या दांड्या, Video Viral

Legends League Cricket: भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगची गणना जगातील दिग्गज गोलंदाजांमध्ये केली जाते.

Manish Jadhav

Harbhajan Singh Viral Video, Chris Gayle Bowled: भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगची गणना जगातील दिग्गज गोलंदाजांमध्ये केली जाते. तो अजूनही खूप तंदुरुस्त आहे आणि त्याच्या गोलंदाजीची धारही कमी झालेली नाही.

Legends League Cricket (LLC2-2023) मध्ये त्याने याची झलक दाखवली. दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर वर्ल्ड जायंट्स आणि इंडिया महाराजा यांच्यातील सामन्यात 42 वर्षीय हरभजनने ख्रिस गेलला क्लीन बोल्ड केले.

हरभजनने गेलला शिकार बनवले

युनिव्हर्स बॉस प्रसिद्ध ख्रिस गेलसमोर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) असा बॉल टाकला की तो फक्त बघतच राहिला. बाहेरची खेळपट्टी असूनही चेंडूने इतका टर्न घेतला आणि सरळ लेगस्टम्पवर आदळला.

गेल आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला. डावाच्या तिसऱ्या षटकात हरभजन गोलंदाजीला आला आणि त्याने सलग 2 वाइड टाकल्यानंतर पहिल्याच चेंडूवर गेलला बोल्ड केले. गेलने 40 चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने 40 धावा केल्या.

कोणीही विश्वास ठेवला नाही

विशेष म्हणजे, हे पाहून हरभजनचाही विश्वास बसेना. नंतरचे रिप्लेही बघितले. मात्र, हरभजनचा चेंडू सरळ लेग स्टम्पला लागल्याचे रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले. अशा स्थितीत त्याला 'बॉल ऑफ द सेंच्युरी' म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

असे करिअर

हरभजन सिंगने आपल्या कारकिर्दीत 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने कसोटीत 417, एकदिवसीय सामन्यात 269 आणि T20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये एकूण 25 बळी घेतले. आता तो क्रिकेट सोडून राजकारणाच्या खेळपट्टीवर उतरला आहे. नुकतेच त्यांना पंजाबमधून (Punjab) राज्यसभा सदस्य करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: म्हादईचा प्रश्न तापला! पाणी प्रश्नावरुन आलेमाव सभागृहात पुन्हा आक्रमक

ChatGPT: चॅटजीपीटीचा धक्कादायक चेहरा! किशोरवयीन मुलांना दिल्या ड्रग्ज अन् आत्महत्येच्या टीप्स; संशोधनातून खुलासा

"म्हादई गोंयची माय,15 कोटी खर्च, तरीही तारीख पे तारीख का?" आमदार बोरकरांचा विधानसभेत थेट सवाल

Video: व्हायरल होण्याच्या नादात तरुणाई बेभान! देशातील सर्वात लांब पुलावर लटकून पठ्ठ्याचा धोकादायक स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धूमाकूळ

Sudan Army Airstrike: सुदानी लष्कराची मोठी कारवाई! दारफुर प्रांतातील विमानतळावर मोठा हवाई हल्ला; 40 कोलंबियन सैनिक ठार

SCROLL FOR NEXT