Chess Competition Dainik Gomantak
क्रीडा

Chess Competition : गुंजल चोपडेकर महिला बुद्धिबळात विजेती; अस्मिता रे उपविजेती

पणजीतील महालक्ष्मी देवस्थान सभागृहात स्पर्धा पार पडली

किशोर पेटकर

Panjim News : श्रीपाद आणि अनुसया कामत तारकर स्मृती राज्यस्तरीय महिला बुद्धिबळ स्पर्धा-निवड चाचणीत गुंजल चोपडेकर हिने विजेतेपद पटकावले. तिने विजयी घोडदौड राखताना स्पर्धेतील सातही डाव जिंकले. स्पर्धा शनिवारी पणजीतील महालक्ष्मी देवस्थान सभागृहात झाली.

तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेने गोवा बुद्धिबळ अस्थायी समिती आणि महालक्ष्मी देवस्थान यांच्या सहकार्याने स्पर्धा घेतली.

अस्मिता रे उपविजेती ठरली. तिचे व वालंका फर्नांडिस यांचे समान सहा गुण झाले. टायब्रेकर गुणांत अस्मिताला दुसरा, तर वालंकाला तिसरा क्रमांक मिळाला. सयुरी नाईक, वैष्णवी परब, श्रीया पाटील, श्रीवल्ली गांधी, सय्यद मैझाह, सय्यद माहदिया, आर्या दाभोळकर यांना अनुक्रमे चौथा ते दहावा क्रमांक मिळाला.

वयोगटात (7 ते 13 वर्षांखालील) दृषा घोंगे, सिदोनिया दा कुन्हा, स्केयला रॉड्रिग्ज, समृथी मालकर, दिया सावळ, साईजा देसाई, वियोमी परब, तन्वी हडकोणकर, लिया सिल्वेरा यांना बक्षीस मिळाले.

स्पर्धेचे पुरस्कर्ते चैतन्य तारकर, महालक्ष्मी देवस्थानचे सचिव नारायण (भाऊ) मांद्रेकर, महेश कांदोळकर, दत्ताराम पिंगे, अरविंद म्हामल, आतिश नाईक, नरेश पेडणेकर, संदेश आमोणकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

SCROLL FOR NEXT