Shubman Gill  Dainik Gomantak
क्रीडा

'गुजरात टायटन्स'च्या शुभमन गिलने हवेत उडी मारून झेलला 'कॅच'

गुजरात संघाने लखनऊवर शानदार विजय मिळवला.

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) 'गुजरात टायटन्स'ने शानदार सुरुवात केली आहे. सोमवारी पहिल्यांदाच गुजरातचा संघ लखनऊ विरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरला. या सामन्यादरम्यान, गुजरात टायटन्सचा (जीटी) स्टार खेळाडू शुभमन गिलने अप्रतिम झेल टिपला.

लखनऊच्या (एलएसजी) डावाचे चौथे षटक सुरू असताना वरुण आरोनच्या चेंडूवर इव्हान लुईसने हवाई शॉट खेळला. चेंडू लेग साइडला गेला आणि 30 यार्डच्या वर्तुळात उभा असलेला शुभमन गिल धावू लागला. चेंडू शुभमन गिलपासून खूप दूर होता, तो मागे धावत होता आणि सुमारे 20 यार्ड धावल्यानंतर त्याने उडी मारली. शुभमनने हा शानदार झेल अगदी सहज पकडला.

सध्या फक्त आयपीएलचे (IPL) चार सामने खेळले गेले आहेत, पण या कॅचला टूर्नामेंटचा कॅच म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे क्रिकेट (Cricket) प्रेमींचे मत आहे. सोशल मीडियावरही (Social Media) हा झेल पाहून चाहत्यांना आश्‍चर्य वाटले.

गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध शानदार सुरुवात केली. पॉवरप्लेमध्येच गुजरातने लखनऊचे चार गडी बाद केले होते. केएल राहुल, क्विंटन डी कॉक, इव्हान लुईस आणि मनीष पांडे पॉवरप्लेमध्येच बाद झाले. गुजरात संघाने लखनऊवर शानदार विजय मिळवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Goa News: डिपॉझिट रिफंड योजनेवरुन 'गोवा कॅन'चा धोक्याचा इशारा! विक्रेते व ग्राहकांमध्ये तंटा होण्याची वर्तवली शक्यता

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT