सेझा अकादमीचा एफसी गोवास धक्का

प्रोफेशनल लीग फुटबॉल : चुरशीच्या लढतीत वास्कोची मनोरावर मात
football tournament
football tournamentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी सेझा फुटबॉल अकादमीने एफसी गोवास पराभवाचा धक्का दिला. साल्वादोर-द-मुंद येथील मैदानावर सेझाने पिछाडीवरून २-१ फरकाने विजय नोंदविला. भरपाई वेळेत पेनल्टी गोल करणारा महंमद फाहीज त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. (Seja Football Academy beats FC Goa in Goa Professional League Football Tournament)

सामन्याच्या २६व्या मिनिटास व्हेलरॉय फर्नांडिसने केलेल्या गोलमुळे एफसी गोवास आघाडी मिळाली. पूर्वार्धात सेझा अकादमीने जोरदार मुसंडी मारली. महंमद फाहीज याने ५९व्या मिनिटास बरोबरीचा गोल केला, नंतर त्याने ९०+२व्या मिनिटास पेनल्टीवर अचूक लक्ष्य साधत संघाला विजयाचे पूर्ण तीन गुण मिळवून दिले, तर एफसी गोवास (FC Goa) दुसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले.

football tournament
गेली दोन वर्षे बंद असलेली वास्कोची कदंब शटल बस सर्विस पुन्हा सुरू करा; प्रवाशांची मागणी

गेली दोन वर्षे बंद असलेली वास्कोची कदंब शटल बस सर्विस पुन्हा सुरू करा; प्रवाशांची मागणीम्हापसा (Mapusa) येथील धुळेर स्टेडियमवर वास्को स्पोर्टस क्लब व यूथ क्लब ऑफ मनोरा यांच्यातील सामना रंगतदार ठरला. चुरशीच्या लढतीत वास्कोने ४-३ फरकाने बाजी मारली. बीव्हन डिमेलोने सामन्याच्या शेवटच्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला. वास्को क्लबसाठी चिराग म्हार्दोळकरने ४०व्या, कर्णधार फ्रान्सिस फर्नांडिसने ४५व्या, सॅव्हलॉन फर्नांडिसने ४५+३व्या, तर बीव्हनने ९०व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. मनोरा संघासाठी महंमद फरिद याने सातव्या मिनिटास पेनल्टीवर पहिला गोल केला. बदली खेळाडू अर्घ्या रॉय याने ४८व्या, तर एल्डन कुलासोने ५५व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला.

football tournament
Murgaon Municipality : उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक अमेय चोपडेकर निश्चित

साळगावकरचा ‘पंचतारांकित’ विजय

माजी विजेत्या साळगावकर एफसीने घोगळ-मडगाव येथील चौगुले महाविद्यालय मैदानावर पंचतारांकित विजय नोंदविला. त्यांनी गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबचा ५-० फरकाने धुव्वा उडविला. सिद्धार्थ कुंडईकरने दोन गोल केले. सहाव्या मिनिटास गोल (Goal) करून संघाचे गोलखाते उघडल्यानंतर सिद्धार्थने ९०+३व्या मिनिटास आणखी एक गोल केला. याशिवाय उमंग गायकवाड याने १७व्या, फेझेर गोम्सने ८३व्या, तर बदली खेळाडू मेहबूब हुबळीकर याने ९०+४व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल नोंदविला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com