Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: हार्दिक ब्रिगेडसमोर सॅमसनची सेना ढेपाळली, गुजरातने 9 गडी राखून मिळवला विजय

IPL 2023 च्या 48 व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) ने राजस्थान रॉयल्सला (RR) पराभूत केले. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरातने 9 गडी राखून विजय मिळवला.

Manish Jadhav

IPL 2023 च्या 48 व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) ने राजस्थान रॉयल्सला (RR) पराभूत केले. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरातने 9 गडी राखून विजय मिळवला.

नाणेफेक जिंकल्यानंतर आरआरचा डाव 17.5 षटकांत 118 धावांवर आटोपला. तर GT ने केवळ 13.5 षटकात 1 गडी गमावून लक्ष्य सहज गाठले. गुजरातला एकमात्र धक्का शुभमन गिलच्या रुपाने बसला, ज्याला 10व्या षटकात यजुवेंद्र चहलने बाद केले.

गुजरातने सामना जिंकला

गुजरात संघाला 119 धावांचे लक्ष्य गाठण्यात कोणतीही अडचण आली नाही. सलामीवीर फलंदाज शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा यांनी अत्यंत सावध फलंदाजी केली.

गिल 36 धावा करुन बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि साहाने मिळून गुजरातला विजय मिळवून दिला. हार्दिकने 39 तर साहाने 41 धावा केल्या. तर दुसरीकडे, राजस्थानचे गोलंदाज सामन्यात म्हणावी तशी कामगिरी करु शकले नाहीत. राजस्थान संघाकडून फक्त यजुवेंद्र चहललाच विकेट मिळवता आली.

राजस्थानची फलंदाजी

राजस्थान रॉयल्सची सुरुवात अजिबात चांगली झाली नाही. सलामीवीर जोस बटलर केवळ 8 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर यशस्वी जैस्वाल 14 धावा करुन बाद झाला.

कर्णधार संजू सॅमसनने विकेटवर टिकून राहण्याचा नक्कीच प्रयत्न केला, मात्र तो केवळ 30 धावा करुन बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडिकलने 12 धावा केल्या.

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) 2 धावा, रियान पराग 4 धावा, शिमरॉन हेटमायर 7 धावा, ध्रुव जुरेल 20 धावा. राजस्थान रॉयल्सला पूर्ण 20 षटकेही खेळता आली नाहीत आणि संपूर्ण संघ 118 धावा करुन बाद झाला.

तसेच, या सामन्यात गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. त्यांनी राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना मुक्तपणे फटकेबाजी करु दिली नाही.

मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, जोशुआ लिटल यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतले. राशिद खानने 4 षटकात केवळ 14 धावा देत 3 बळी घेतले. तर नूर अहमदने 2 बळी घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT