Gujarat Gaints Dainik Gomantak
क्रीडा

Gujarat Giants टीमला तगडा झटका! कॅप्टनच WPL 2023 मधून बाहेर, आता 'ही' खेळाडू घेणार जागा

गुजरात जायंट्सची कर्णधार उर्वरित WPL 2023 हंगामातून बाहेर झाली आहे.

Pranali Kodre

Beth Mooney ruled out of WPL 2023: भारतात सध्या वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचा पहिला हंगाम खेळवला जात आहे. दरम्यान, पहिल्याच आठवड्यानंतर गुजरात जायंट्स संघाला तगडा झटका लागला आहे. त्यांच्या संघाची कर्णधार बेथ मुनी उर्वरित डब्ल्यूपीएल 2023 स्पर्धेतून बाहेर झाली आहे.

मुनीला 4 मार्च रोजी या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध फलंदाजी करत असताना गुडघ्याला दुखापत झाली. याच दुखापतीमुळे ती फलंदाजी करत असतानाच रिटायर्ड हर्ट देखील झाली होती. या सामन्यात गुजरातला तब्बल 143 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

या सामन्यानंतर मुनी गुजरातकडून पुढील दोन सामने खेळली नाही. अखेर तिची दुखापत गंभीर असल्याने ती या स्पर्धेतूनच बाहेर झाली असून आता पुढील उपचारांसाठी ऑस्ट्रेलियाला परतेल.

दक्षिण आफ्रिकेच्या 23 वर्षीय खेळाडूला संधी

आता गुजरात जायंट्सच्या संघात मुनीच्या जागेवर दक्षिण आफ्रिकेची २३ वर्षीय फलंदाज लॉरा वोल्वार्डची बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. लॉरा वोल्वार्ड सध्या पाकिस्तानमध्ये वूमन्स लीग प्रदर्शनीय सामने खेळण्यासाठी गेली होती. पण आता तिला डब्ल्यूपीएल स्पर्धेसाठी या सामन्यांमधून सुपर वूमन संघातून मुक्त करण्यात आले आहे.

तसेच आता गुजरातचे नेतृत्व भारताची स्नेह राणा करणार आहे. तसेच उपकर्णधारपद ऍश्ले गार्डनरला सोपवण्यात आले आहे.

दुरून पाठिंबा देत राहिल - मुनी

मुनीने ती स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर म्हटले आहे की 'मी खरंच पहिला डब्ल्यूपीएल हंगाम खेळण्यासाठी उत्सुक होते. पण दुर्दैवाने दुखापती खेळाचा भाग आहेत आणि मला वाईट वाटत आहे की मी उर्वरित हंगामाला मुकणार आहे.'

'पण मी संघाच्या कामगिरीवर दुरूनही लक्ष ठेवणार आहे आणि मी प्रत्येक दिवशी संघाला प्रोत्साहन देत राहिल. मी या हंगामात जरी मैदानातून दूर झाली असले तरी मी पुढच्या हंगामात आणखी मजबूतीने, तंदुरुस्तीसह आणि धावांच्या भुकेसह दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.'

मुनीला गुजरात जायंट्सने लिलावात 2 कोटी रुपयांना खरेदी केले होते. तिने नुकतेच गेल्या महिन्यात झालेल्या महिला टी20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 74 धावांची खेळी केली होती. ती त्या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूही ठरली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

SCROLL FOR NEXT