Gujarat Giants Dainik Gomantak
क्रीडा

DC vs GG, WPL 2023: गुजरात जायंट्स दिल्ली कॅपिटल्सवर भारी, 11 धावांनी जिंकला सामना

DC vs GG, WPL 2023: महिला प्रीमियर लीग 2023 च्या 14 व्या सामन्यात गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा 11 धावांनी पराभव केला.

Manish Jadhav

DC vs GG, WPL 2023: महिला प्रीमियर लीग 2023 च्या 14 व्या सामन्यात गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा 11 धावांनी पराभव केला. गुजरातचा स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे, तर दिल्लीचा हा दुसरा पराभव आहे.

दरम्यान, लॉरा वोल्फर्टच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 147 धावा केल्या. गुजरातकडून लॉराने सर्वाधिक 57 धावा केल्या.

तिने आपल्या डावात 45 चेंडूंचा सामना केला आणि 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. दिल्लीकडून जेस, रेड्डी आणि कॅपने प्रत्येकी एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 18.4 षटकांत 136 धावांवर गारद झाला.

दुसरीकडे, गुजरात जायंट्सचा संघ महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात 4 सामने गमावल्यानंतर गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघ 5 पैकी 4 सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

तसेच, स्पर्धेत पुढे जाण्यासाठी गुजरातसाठी पुढील सामने जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या स्पर्धेत दिल्ली आणि गुजरात यापूर्वी एकदा भिडले आहेत, जिथे शफाली वर्माच्या (Shafali Verma) धडाकेबाज फलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सने 10 गडी राखून पराभव पत्करला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT