Graham Gooch Dainik Gomantak
क्रीडा

'या' खेळाडूने शतक ठोकत भारताला विश्वचषकातून केले आऊट

अशीच एक घटना 1987 साली घडली होती जेव्हा एका इंग्लिश फलंदाजाने वर्ल्ड कपच्या (World Cup) सेमीफायनलमध्ये स्वीप मारत भारताला स्पर्धेतून बाहेर केले होते.

दैनिक गोमन्तक

भारत नेहमीच आपल्या फिरकीपटूंच्या बळावर चमक दाखवत आला आहे. टीम इंडियाने (Team India) आपल्या फिरकीच्या जाळ्यात जगभरातील संघांना अडकवून पराभूत केले आहे. तर दुसरीकडे अनेक फलंदाजांनी आपल्या क्रिडा कौशल्याच्या जोरावर भारताचाही डाव मोडून काढला. अशीच एक घटना 1987 साली घडली होती जेव्हा एका इंग्लिश फलंदाजाने वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये स्वीप मारत भारताला स्पर्धेतून बाहेर केले होते. इंग्लंडचा (England) सलामीवीर ग्रॅहम गूचने (Graham Gooch) हा चमत्कार केला. त्याने भारतीय फिरकी जोडी रवी शास्त्री आणि मनिंदर सिंग यांना स्वीप शॉटद्वारे घायघुतीला आणले होते. गूचने शतक झळकावत इंग्लंडला 35 धावांनी विजय मिळवून दिला होता. भारताला विजेतेपदासाठी योग्य तो बचाव करता आला नाही. हा सामना 1987 मध्ये या दिवशी (On This Day In Cricket) म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी खेळला गेला होता.

या सामन्यात भारताचा कर्णधार कपिल देवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडे कपिल देव, मनोज प्रभाकर आणि चेतन शर्मा हे सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज होते. तर शास्त्री-मनिंदर सिंग फिरकीची जबाबदारी घेत असत. परंतु ग्रॅहम गूचने या दिग्गज खेळाडूंची पूर्ण रणनिती उधळून लावली होती. गूचने फिरकीपटूंचा चांगलाच समाचार घेतला होता. गूचने 11 चौकारांच्या मदतीने 115 धावांची खेळी उभारली. त्याच्याशिवाय कर्णधार माईक गॅटिंगने 56 धावांची खेळी उभारली होती. त्याचवेळी अॅलन लॅम्बने नाबाद 32 धावा करत संघाला सहा विकेट्सवर 254 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून मनिंदर सिंगने 54 धावांत तीन बळी घेतले. तो टीम इंडियाकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता.

अझरशिवाय इतर फलंदाजांनी निराशा केली

इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजांनी सुरुवात उत्तम केली होती. मात्र मोहम्मद अझरुद्दीन वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी उभारता आली नाही. अझहरने 64, क्रिस श्रीकांतने 31 आणि कपिल देवने 30 धावा केल्या. परंतु मोठ्या डावातील तूट भारताला महागात पडली. तसेच, एकाही फलंदाजाने क्रीझवर थांबण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे भारताचा डाव 219 धावांवर आटोपला. त्याला पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाहीत. भारताचा डाव 45.3 षटकांतच आटोपला. अखेर भारतीय संघाला 35 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यासह भारत त्यांच्याच भूमीवर सुरु असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडला.

हा सामना सुनील गावस्कर यांच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यात चार धावा करुन तो बाद झाला. इंग्लंडकडून फिरकीपटू एडी हेमिंग्जने चार आणि नील फॉस्टरने तीन विकेट्स घेतल्या. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळला. जिथे ऑस्ट्रेलिया विजेता ठरला आणि प्रथमच विश्वचषक जिंकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT