पणजी : खेळ आणि कला या मानवी जीवनाच्या अत्यंत महत्त्वाच्या बाबी असून राज्यातील खेळाचा दर्जा सुधारणेसाठी क्रीडा धोरणाचा रोड मॅप बनवण्यात येणार असून यासाठी राज्यातील तज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती नवे क्रीडा, कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे (Govind Gawde) यांनी दिली. त्यांनी आज मंत्रालयात येऊन कार्यालयाचा ताबा घेतला.
मंत्री गावडे म्हणाले, क्रीडा क्षेत्रात सांघिक आणि वैयक्तिक पातळीवरील अति उच्च कामगिरीमुळे व्यक्ती स्वतःचे आणि राज्याचा नाव उज्वल करू शकते. याचा प्रत्यय अनेक वेळा आलेला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील मुलांमध्ये सुद्धा गुणवत्ता असून ती शोधण्याची गरज आहे. यासाठी क्रीडा क्षेत्राच्या 'रोड मॅप' ची आवश्यकता आहे.
राज्यात विविध खेळांमध्ये नैपुण्य मिळवले अनेक खेळाडू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रोडमॅप बनविण्यात येईल आणि गुणवत्ता असणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाईल. यासाठीच क्रीडा क्षेत्रातील साधन सुविधांच्या सुधारणेवर विशेष लक्ष देण्यात येईल. राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या साधन सुविधाची पाहणी करून त्यात नव्याने भर टाकावी लागली तर तीही टाकण्यात येईल. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम सारखे क्रीडा (Sports) क्षेत्रासाठी उपयुक्त असणारे स्टेडियमची उभारणी झाली असली तरी त्या प्रकल्पांच्या देखभालीसाठी हे प्रकल्प व्यावसायिक दृष्ट्या वापरले जावेत अशी ही आपली इच्छा आहे, त्यादृष्टीनेही प्रयत्न केले जातील.
म्हापसा, काणकोणात रवींद्र भवन
राज्यातील कलावंतांची शिखर संस्था असलेली कला अकादमीची इमारत नियमित वापरण्याच्या दृष्टीने अयोग्य बनली होती. आता तिच्या दुरुस्तीचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले असून केवळ दहा टक्के काम बाकी आहे. ती लवकरात लवकर कलावंतांच्या सेवेत रुजू करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. याशिवाय काणकोण रवींद्र भवन आणि बार्देश तालुक्यासाठीचे म्हापसा (Mapusa) येथील रवींद्र भवन उभारण्यासाठीही कला आणि संस्कृती मंत्रालय प्रयत्न करेल, अशी माहितीही मंत्री गावडे यांनी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.