Shrungi Bandekar Dainik Gomantak
क्रीडा

Shrungi Bandekar: गोव्याची जलतरणपटू श्रुंगी बांदेकरच्या शिरपेचात मानाचा तुरा; चीनमधील स्पर्धेत करणार देशाचे नेतृत्व

चीनमध्ये जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा होणार आहे.

किशोर पेटकर

Shrungi Bandekar in Indian Swimming Squad: गोव्याची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू श्रुंगी बांदेकर हिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. चीनमधील चेंगडू येथे सुरू असलेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची तिची ही पहिलीच वेळ ठरली.

लागोपाठ दोन वर्षे श्रुंगीने खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा गाजविली. तिला बंगळूर येथे भूषण कुमार यांचे मार्गदर्शन लाभते. त्यानिमित्त तेथील जैन विद्यापीठात शिकत असल्याने खेलो इंडिया स्पर्धेत तिने दोन्ही वर्षे या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले.

(World University Games 2023 in China)

यंदा उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्धनगर येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत तिने पाच सुवर्णांसह एकूण नऊ पदके जिंकून सर्वोत्तम महिला जलतरणपटूचा करंडक पटकावला. या शानदार कामगिरीच्या आधारे तिला जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाचे द्वार खुले झाले. जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील जलतरण शर्यतींना मंगळवारपासून सुरवात होईल.

खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत 17 पदके

श्रुंगीने 2022 व 2023 मधील खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत मिळून एकूण 17 पदके जिंकली आहेत. यंदा ९, तर गतवर्षी तिला 8 पदके मिळाली होती. तिने 2022 मध्ये तिने 4 सुवर्ण, 1 रौप्य व 3 ब्राँझपदके जिंकली. यंदा 5 सुवर्ण व 4 रौप्य अशी कामगिरी सुधारली.

गोव्यातर्फे राष्ट्रीय स्पर्धेतही यश

ज्युनियर पातळीवर गोव्यातर्फे श्रुंगीने सातत्याने राष्ट्रीय पदके जिंकली. सीनियर गटातही तिने दोन वर्षांत प्रगती साधली. राज्याचे प्रतिनिधित्व करताना 2022 मध्ये गुवाहाटी येथे तिने 75 व्या राष्ट्रीय सीनियर स्पर्धेत 400 मीटर वैयक्तिक मेडलीत रौप्यपदक जिंकले.

यावर्षी जुलै महिन्याच्या सुरवातीस हैदराबादमध्ये झालेल्या 76 व्या राष्ट्रीय सीनियर स्पर्धेत श्रुंगीने 2 ब्राँझपदकांची कमाई केली. तिने 200 मीटर मेडली व 200 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत दुसरा क्रमांक पटकावला. याशिवाय गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने 200 मीटर मेडलीत ब्राँझपदक पटकावले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT