goa And Gujrat Football Team In Santosh Trophy 2023 Dainik Gomantak
क्रीडा

Santosh Trophy 2023: गुजरातने रोखल्यामुळे गोव्याला धक्का; जम्मू-काश्मीरचा धुव्वा उडवून केरळ अव्वल

किशोर पेटकर

Goa And Gujrat Football Team In Santosh Trophy 2023: सामन्याच्या इंज्युरी टाईमच्या नवव्या मिनिटास गोल नोंदवून गोव्याने पराभवाच्या दाढेतून सुटका करून घेतली, पण गुजरातने १-१ असे गोलबरोबरीत रोखल्यामुळे त्यांना ७७व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या ‘अ’ गटात धक्का बसला. केरळने जम्मू-काश्मीरचा ६-१ असा धुव्वा उडवून गटात अव्वल स्थान प्राप्त केले.

२०२१-२२ मध्ये गोव्याला पश्चिम विभागीय फेरी पार करता आली नव्हती. तेव्हा निर्णायक सामन्यात त्यांना गुजरातकडून पराभव पत्करावा लागला होता. यावेळी घरच्या मैदानावर खेळत असूनही गुजरातचा संघ गोव्यासाठी खडतर ठरला.

बाणावली येथे शुक्रवारी झालेल्या लढतीत चुनसाबा बरियम याने ५८व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे गुजरातने आघाडी घेतली. मार्सेलिना परेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघ विजयाच्या दिशेने कूच करत असताना ९०+९व्या मिनिटास ज्योबर्न कार्दोझच्या गोलमुळे गोव्याला बरोबरी साधणे शक्य झाले.

त्याने हा गोल जोसेफ क्लेमेंतच्या पासवर नोंदविला. त्यापूर्वी, या लढतीतही गोव्याची संधी गमावण्याची मालिका कायम राहिले. गटातील पहिल्या लढतीत त्यांनी छत्तीसगडला १-० असे हरविले होते.

केरळचा धडाका कायम

स्पर्धेतील अगोदरच्या लढतीत गुजरातला ३-० फरकाने हरवलेल्या केरळने तोच धडाका शुक्रवारी सकाळच्या सत्रात कायम राखला. जम्मू-काश्मीरने अगोदरच्या लढतीत छत्तीसगडला १-० असे नमविले होते, परंतु माजी विजेत्यांविरुद्ध त्यांचा प्रतिकार जाणवलाच नाही.

केरळला सलग दुसरा विजय मिळवून देताना जितिन गोपाळकृष्णन याने अनुक्रमे ८ व ५५व्या मिनिटास गोल केला.

याशिवाय ई. साजीश (१४वे मिनिट), मुहम्मद आशिक शौकतअली (४५+१वे मिनिट), के. अब्दुल रहीम (६७वे मिनिट), रिझवानअली एदाक्काविल (७४वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. जम्मू-काश्मीरचा एकमात्र गोल फैझल मकसूद ठाकूर याने ६१व्या मिनिटास केला.

अ गटातील स्थिती

स्पर्धेच्या अ गटात दोन्ही सामने जिंकल्यामुळे चांगल्या गोलसरासरीसह केरळचे सर्वाधिक सहा गुण झाले आहेत. त्यांनी दोन सामन्यांत सहा गोल नोंदविले असून फक्त एक गोल स्वीकारला आहे.

+५ या गोलसरासरीमुळे त्यांची स्थिती खूपच भक्कम झाली आहे. गोव्याचे दोन लढतीतून, तर गुजरातने तीन सामन्यांतून प्रत्येकी चार गुण झाले आहेत.

तीन सामने खेळल्यानंतर जम्मू-काश्मीरचे तीन गुण कायम राहिले आहेत. छत्तीसगड संघ दोन्ही सामन्यांत पराभूत झाला आहे. स्पर्धेत आता रविवारी (ता. १५) छत्तीसगड विरुद्ध केरळ, गोवा विरुद्ध जम्मू-काश्मीर अशा लढती होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT