Goa And Portugal Veterans Football Team Dainik Gomantak
क्रीडा

Goa Veterans Football: गोव्‍याचे वेटरन्‍स फुटबॉलपटू पोर्तुगालच्‍या दौर्‍यावर

लिस्‍बन येथे पोर्तुगाल वेटरन्‍स संघाबरोबर पहिला सामना

सुशांत कुंकळयेकर

Goa Veterans Football Team On Portugal Visit: गोवा आणि पोर्तुगाल यांच्‍यातील फुटबॉल संबंध पूर्वीपासून जोडलेले आहेत. हे संबंध अधिक वृद्धींगत व्‍हावेत यासाठी गोव्‍याच्‍या 12 वेटरन्‍स खेळाडूंचा संघ पोर्तुगाल दौर्‍यावर गेला आहे.

लिस्‍बन येथे पोर्तुगाल वेटरन्‍स संघाबरोबर पहिला सामना झाला. या सामन्‍यात गोव्‍याच्‍या संघावर पोर्तुगाल संघाने ४-२ अशा गोल फरकाने विजय मिळविला.

अॅथलेटिको क्‍लब द पोर्तु साल्‍वाे येथील मैदानावर हा सामना खेळविण्‍यात आला. पेले फर्नांडिस यांच्‍या नेतृत्‍वाखाली या दौर्‍यावर गेलेल्‍या या संघात धेंपो आणि सेझा या संघासाठी पूर्वी खेळलेले एल्‍वीस गोईस यांचा समावेश आहे.

पहिल्‍या सामन्‍यात दोन्‍ही बाजूने अटीतटीचा खेळ झाला. पोर्तुगाल संघाने दोन गोलांची आघाडी घेतल्‍यानंतर पेले फर्नांडिस यांनी गोव्‍यासाठी पहिला गोल केला.

त्‍यानंतर उत्तरार्धात गोव्‍याचा दुसरा गोल साल्‍वादोर कार्‍व्‍हालो यांनी केला. पोर्तुगालसाठी ऑस्‍कर, बाल्‍दे, फ्रान्‍सिस्‍को आणि फर्नांदो यांनी गोल केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

SCROLL FOR NEXT