Goa Under 19 Womens Cricket Team announced Dainik Gomantak
क्रीडा

Under 19 Womens Cricket: हर्षिता यादवकडे गोव्याचे नेतृत्व; 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघ जाहीर

गुवाहाटी येथे आठ ऑक्टोबरपासून स्पर्धा

किशोर पेटकर

Goa Under 19 Womens Cricket Team: महिलांच्या 19 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू हर्षिता यादव गोव्याच्या संघाचे नेतृत्व करेल. ‘ब’ गटातील सामने ८ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत आसाममधील गुवाहाटी येथे खेळले जातील.

गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) स्पर्धेसाठी गुरुवारी 16 सदस्यीय संघ जाहीर केला. गोव्याच्या गटात ओडिशा, हिमाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मुंबई या संघांचा समावेश आहे.

गोव्याच्या संघात हर्षिता यादव (कर्णधार), रिया नाईक (उपकर्णधार), पलक आरोंदेकर, पूजा निषाद, निखिला नाईक, प्रेषा नाईक, सनिका धुरी, सिद्धी सवासे, आराधना सरोज, मृण्मयी भिके, अस्मी पालव, पूजा यादव, निधी गोवेकर, रिया मालवणकर, संचिता सैल, स्वराली कासकर यांचा समावेश आहे.

गोव्याचा पहिला सामना आठ ऑक्टोबरला ओडिशाविरुद्ध होईल. त्यानंतर अनुक्रमे हिमाचल प्रदेश (१० ऑक्टोबर), गुजरात (१२ ऑक्टोबर), कर्नाटक (१४ ऑक्टोबर), मुंबई (१६ ऑक्टोबर) या संघाविरुद्ध लढती होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT