MLA Rohan Khanwate Dainik Gomantak
क्रीडा

Goa : बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षांनी धरले क्रीडामंत्र्यांना धारेवर

पुढील महिन्यात टोकियोत (Tokyo) होणाऱ्या ऑलिंपिकसाठी (Olympics) गोव्याचे लेनी डिगामा यांची बॉक्सिंग स्पर्धेसाठी (Boxing competitions) मूल्यांकनकर्ते या जबाबदारीसाठी निवड झाली आहे.

team dainik gomantak

पणजी - गोवा बॉक्सिंग (Goa Boxing) असोसिएशनप्रती राज्याचे क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांनी दाखविलेल्या अनास्थेप्रकरणी संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहन खंवटे (MLA Rohan Khanwate) यांनी तीव्र खेद व्यक्त केला असून क्रीडामंत्र्यांना धारेवर धरले आहे.

पुढील महिन्यात टोकियोत होणाऱ्या ऑलिंपिकसाठी गोव्याचे लेनी डिगामा यांची बॉक्सिंग स्पर्धेसाठी मूल्यांकनकर्ते या जबाबदारीसाठी निवड झाली आहे. त्यानंतर डिगामा यांनी बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतल्यानंतर, क्रीडामंत्री आजगावकर गोव्यातील बॉक्सिंगबाबत अनभिज्ञ असल्याचा आरोप केला होता, तसेच गेल्या पाच वर्षांत गोवा क्रीडा प्राधिकरणाकडून देय असलेले 22 लाख रुपयांचे अनुदान रखडल्याची माहिती दिली होती. यासंदर्भात काल क्रीडामंत्री आजगावकर यांनी लेनी डिगामा यांचा चुकीने लेनी गोम्स असा चुकीचा उल्लेख केला होता.

यासंदर्भात आमदार खंवटे यांनी गुरुवारी सांगितले, की ‘‘क्रीडामंत्री आजगावकर यांचा मी निषेध करत आहे. त्यांना आपल्या जबाबदारीचे भान नाही. क्रीडा खात्याच्या साधनसुविधांचे लेखापरीक्षण झालेले नाही. क्रीडा खाते कारभार चालविण्यास सक्षम नाही. राज्यातील क्रीडा संघटना अस्तिस्व राखण्यासाठी धडपडत असून त्यांना पाठिंबा मिळत नाही.’’

‘‘गोवा बॉक्सिंग असोसिएशनतर्फे आपण क्रीडामंत्री आजगावकर, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. ही संघटना नोंदणीकृत आहे, १९८५ पासून कार्यरत आहे. सारं काही कागदोपत्री असूनही खात्याकडून संघटनेला मदत मिळत नाही. बॉक्सिंग या खेळाने राज्यासाठी कितीतरी पदके जिंकलेली आहेत. आम्हाला मदत हवी आहे. आम्ही अंदाजपत्रक सादर करूनही आमचे अनुदान प्रलंबित आहे. लेनी यांनी मागे ऑलिंपिक स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते, अजूनही त्याबाबत दखल घेण्यात आलेली नाही. टोकियो ऑलिंपिकसाठी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी लेनी यांची पाठ थोपटली, पण क्रीडामंत्री आजगावकर यांनी त्यावर पाणी फेरले आहे,’’ असे आमदार खंवटे म्हणाले. लेनी यांचे बॉक्सिंगमधील कार्य अतुलनीय असून क्रीडामंत्र्यांना
त्यांच्याबद्दल गांभीर्य नाही हे योग्य नव्हे, असेही खंवटे यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT