Goa : बॉक्सिंग खेळाबद्दल आस्था : क्रीडामंत्री आजगावकर

बॉक्सिंग खेळाचे बारकावे ठाऊक नसतील, पण या खेळबद्दल निश्चितच आस्था आहे, बॉक्सिंगसह सर्वच खेळ आणि खेळाडूंच्या विकासाची आपल्यास तळमळ आहे.
क्रीडामंत्री मनोहर आजगावकर
क्रीडामंत्री मनोहर आजगावकरदैनिक गोमन्तक

गोवा बॉक्सिंग (Goa boxing) असोसिएशन प्रकरणी आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी (आयटीओ) लेनी डिगामा आणि नंतर संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहन खंवटे यांनी जाहीर टीका केल्यानंतर शुक्रवारी क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर (Sports Minister Ajgaonkar) यांनी आपली अधिकृत भूमिका मांडली.(Goa : Love the sport of boxing : Sports Minister Ajgaonkar)

बॉक्सिंग खेळाचे बारकावे ठाऊक नसतील, पण या खेळबद्दल निश्चितच आस्था आहे, बॉक्सिंगसह सर्वच खेळ आणि खेळाडूंच्या विकासाची आपल्यास तळमळ आहे, असे आजगावकर यांनी सांगितले. ते राज्याचे उपमुख्यमंत्रीही आहेत.

क्रीडामंत्री मनोहर आजगावकर
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग पंचगिरी आयोगावर गोव्याचे लेनींची वर्णी

डिगामा यांचे अभिनंदन

क्रीडामंत्री आजगावकर यांनी टोकियो ऑलिंपिकसाठी बॉक्सिंगचे तांत्रिक अधिकारी (मूल्यांकनकर्ते) म्हणून निवड झाल्याबद्दल लेनी डिगामा यांचे अभिनंदनही केले आहे. डिगामा यांची जगातील सर्वात मोठ्या क्रीडा सोहळ्यासाठी झालेली निवड गोमंतकीयांसाठी अभिमानाची बाब आहे. गोव्यासाठी गौरव प्राप्त करून दिल्याबद्दल डिगामा यांचे अभिनंदन करतोय, असे आजगावकर यांनी सांगितले. डिगामा यांचा क्रीडा खात्यातर्फे लवकरच सन्मान करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

संघटनेच्या कैफियतीची दखल

गोवा बॉक्सिंग असोसिएशनला देय असलेले अनुदान प्रलंबित आहे. हा मुद्दा दोन दिवसांपूर्वी डिगामा यांनी उपस्थित केला होता. यासंदर्भात, डिगामा यांच्या कैफियतीची दखल आपण घेतली आहे. योग्य प्रक्रियेद्वारे हा विषय सोडविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. डिगामा यांच्या माहितीनुसार, मागील पाच वर्षांत सुमारे २२ लाख रुपयांचे अनुदान गोवा बॉक्सिंग असोसिएशनला देण्यात आलेले नाही. त्यानंतर गुरुवारी आमदार खंवटे यांनी आपली संघटना नोंदणीकृत आहे, सारं काही कागदोपत्री असूनही खात्याकडून संघटनेला मदत मिळत नाही, तसेच अंदाजपत्रक सादर करूनही अनुदान प्रलंबित असल्याची माहिती दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com