Santosh Trophy Football Dainik Gomantak
क्रीडा

Santosh Trophy Football: गोवा संघ मुख्य फेरीत दाखल; तामिळनाडुवर मात

निर्णायक सामन्यात तीन गोलने विजय

Akshay Nirmale

Santosh Trophy Football: संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत मागील वेळेस गोव्यास पश्चिम विभागीय फेरीतच गारद होण्याची नामुष्की आली होती, यावेळस माजी पाच वेळच्या माजी विजेत्या संघाने विश्वास सार्थ ठरविताना दमदार खेळ केला आणि गटसाखळीतून मुख्य फेरीत पात्रता मिळविली.

आसाममधील कोक्राझार येथे झालेल्या ७६व्या संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेच्या गट तीनमध्ये गोव्याने शुक्रवारी तमिळनाडूस 3-0 फरकाने नमवून अव्वल क्रमांक मिळविला. नागालँडला अगोदरच्या लढतीत अरुणाचल प्रदेशने 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. त्यामुळे गोवा, तसेच नागालँडचे समान 11 गुण झाले. नॉर्बर्ट गोन्साल्विस यांच्या मार्गदर्शनाखालील गोव्याची +5 अशी गोलसरासरी झाली आणि गटविजेता या नात्याने त्यांना पुढील फेरीत प्रवेश मिळाला.

नागालँडचा संघ +4 गोलसरासरीसह दुसऱ्या स्थानी राहिला. या गटात यजमान आसामचा संघ नऊ गुणांसह तिसऱ्या, उत्तर प्रदेश सात गुणांसह चौथ्या, तर अरुणाचल प्रदेश चार गुणांसह पाचव्या स्थानी राहिला. तमिळनाडूस पाचही सामन्यांत पराभूत व्हावे लागले.

फाहीझ विजयाचा शिल्पकार

दोन गोल करणारा महंमद फाहीझ गोव्याच्या विजयात शिल्पकार ठरला. तमिळनाडूविरुद्धच्या लढतीत ट्रिजॉय डायस याने 12 व्या मिनिटास गोव्याला आघाडी मिळवून दिली. नंतर उत्तरर्धात फाहीझने दोन गोल करून गोव्याला आवश्यक गोलसरासरी गाठून दिली. नागालँडला मागे टाकण्यासाठी गोव्याला सामना तीन गोलच्या फरकाने जिंकणे आवश्यक होते. फाहीझने अनुक्रमे 47 व 68 व्या मिनिटास गोल केला. स्पर्धेच्या साखळी फेरीत या आघाडीपटूने फाहीझ, तसेच ट्रिजॉय यांनी प्रत्येकी तीन गोल नोंदविले.

गोव्याची स्पर्धेतील कामगिरी

- विजयी वि. आसाम 1-0

- बरोबरी वि. उत्तर प्रदेश 2-2

- विजयी वि. अरुणाचल 2-1

- बरोबरी वि. नागालँड 0-0

- विजयी वि. तमिळनाडू 3-0

- गोल नोंदविले 8, गोल घेतले 3

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT