India vs Sri Lanka, 2nd T20I: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या एका खेळाडूसाठी कर्णधार हार्दिक पांड्या खलनायक ठरला आहे. कर्णधार हार्दिक पांड्याने एका खेळाडूला सलग दुसऱ्या टी-20 सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले असून त्याला खेळण्याची संधी दिली नाही. दुसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या या खेळाडूला संधी देईल, अशी सर्वांना अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. कर्णधार हार्दिकने पहिल्या टी-20 सामन्याप्रमाणेच दुसऱ्या टी-20 सामन्यातही या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले आहे.
टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑफस्पिन अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले आहे. यापूर्वी मुंबईत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यातही कर्णधार हार्दिक पांड्याने या खेळाडूला फारसे महत्त्व दिले नव्हते. वॉशिंग्टन सुंदरसारख्या घातक फिरकी अष्टपैलूला कर्णधार हार्दिक पांड्या प्लेइंग इलेव्हनमधून कसा बाहेर ठेऊ शकतो, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वॉशिंग्टन सुंदर घातक ऑफ-स्पिन गोलंदाजीमध्ये माहिर आहे. त्याशिवाय, तो मीडल ऑर्डरमध्ये त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. वॉशिंग्टन सुंदर त्याच्या गोलंदाजीदरम्यान खूप किफायतशीर ठरतो. विशेष म्हणजे, त्याच्या विकेट टू विकेट बॉलिंगने तो प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांसाठी डोकेदुखीही ठरतो. असे असूनही कर्णधार हार्दिक पांड्याने वॉशिंग्टन सुंदरसारख्या अष्टपैलू खेळाडूला संधी न देता सलग दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये लेग-स्पिनर यजुवेंद्र चहलला (Yajuvendra Chahal) संधी दिली आहे.
यजुवेंद्र चहलबद्दल सांगायचे झाल्यास, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याने 2 ओव्हरमध्ये 26 धावा दिल्या. याशिवाय चहलनेही श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 4 षटकात 30 धावा दिल्या. चहलला विकेट नक्कीच मिळाली असली तरी टीम इंडियाला यापेक्षा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. दुसरीकडे, वॉशिंग्टन सुंदरने 32 टी-20 सामन्यात 47 धावा करण्यासोबतच गोलंदाजीत 26 विकेट्स घेतल्या आहेत. टीम इंडियासाठी 4 कसोटीत 265 धावा करण्यासोबतच वॉशिंग्टन सुंदरने 6 विकेट्सही घेतल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदरने 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये 212 धावा करण्यासोबतच 14 विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.