table tennis Dainik Gomantak
क्रीडा

Goa Table Tennis Tournament : रोझरी हायस्कूलला दुहेरी किताबाचा मान

राज्यस्तरीय टेबल टेनिस : १४ वर्षांखालील वयोगटातील मुला-मुलींत जेतेपद

गोमन्तक डिजिटल टीम

Table Tennis Tournament : क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील टेबल टेनिस स्पर्धेत कुजिरा येथील रोझरी हायस्कूलने दुहेरी किताब पटकावला. त्यांनी मुला व मुलींच्या गटात विजेतेपद प्राप्त केले. स्पर्धा सोमवारी कांपाल येथील इनडोअर स्टेडियममध्ये झाली.

मुलांच्या अंतिम लढतीत रोझरी हायस्कूलने सां जुझे द आरियल येथील किंग्स स्कूलला ३-१ फरकाने हरविले. म्हापशाच्या सारस्वत विद्यालयाने फोंड्याच्या जीव्हीएम उत्कर्ष विद्या मंदिरावर ३-१ फरकाने विजय नोंदवून तिसरा क्रमांक पटकावला.

मुलींच्या अंतिम सामन्यात रोझरी हायस्कूलने मडगावच्या मनोविकास इंग्लिश स्कूलवर ३-१ असा विजय मिळविला. म्हापशाच्या जी. एस. आमोणकर विद्या मंदिरास तिसरा क्रमांक मिळाला. त्यांनी मंगेशीच्या व्हीडी अँड एसव्ही वागळे हायस्कूलला ३-१ फरकाने नमविले.

रोझरी हायस्कूलच्या मुलांच्या संघात दिव्यांश कश्यप, लामजिंग्बा लैतान्थेम, चिन्मय मणेरकर, एथन कामोतिम, भावेश शिरोडकर या खेळाडूंचा, तर मुलींच्या संघात प्रतिग्या, ब्रेटनिया लैश्राम, वंशिका मिश्रा, योगिता, अंबिशा नाईक या खेळाडूंचा समावेश होता. दोन्ही संघाला शाळेचे शारीरिक शिक्षण शिक्षक निकेश मंगेशकर यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण क्रीडा खात्याच्या मुख्यालयातील विभागीय क्रीडा आयोजक उमेश फडते, स्पर्धेचे मुख्य तांत्रिक अधिकारी विष्णू कोलवाळकर, तांत्रिक अधिकारी जयवंत हमनावर, खात्याचे राज्य क्रीडा आयोजक अनंत सावळ यांच्या उपस्थितीत झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT