मंथन खुटकर  Dainik Gomantak
क्रीडा

Goa: सुयशच्या अनुपस्थितीत मंथनकडे नेतृत्व

गोव्याने प्रथमच स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: कर्णधार सुयश प्रभुदेसाई (Suyash Prabhudesai) विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेसाठी रांची येथ सीनियर संघात दाखल झाल्यानंतर सलामीचा मंथन खुटकर याची गोव्याच्या 25 वर्षांखालील एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.

मंथनच्या निवडीची माहिती गोवा क्रिकेट असोसिएशनचे (Goa Cricket Association) सचिव विपुल फडके यांनी दिली. बंगळूर येथे स्पर्धेची बाद फेरी सुरू आहे. गोव्याने प्रथमच स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. रविवारी त्यांची पंजाबविरुद्ध होईल. या लढतीत मंथन कर्णधार या नात्याने नाणेफेकीस जाईल. महत्त्वपूर्ण सामन्यात गोव्याला मध्यफळीत अनुभवी सुयशची अनुपस्थिती जाणवेल. त्याने स्पर्धेत 6 सामन्यांतील 4 डावांत 2 अर्धशतकांसह 193 धावा केल्या.

गोव्याने शुक्रवारी उपउपांत्यपूर्व लढतीत तमिळनाडूस (Tamil Nadu) 9 धावांनी हरविले. पाऊस आल्यामुळे सामन्याचा निकाल व्हीजेडी पद्धतीनुसार ठरविण्यात आला. तुनीष सावकारच्या 86 धावांच्या बळावर गोव्याने सर्वबाद 207 धावा केल्या, नंतर पावसामुळे खेळ थांबला तेव्हा तमिळनाडूने 30.2 षटकांत 7 बाद 158 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs Goa: 'डॉग शेल्टर' होमसाठी सरकार कोर्टावर अवलंबून! मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची माहिती

Waste Management: वाहनातून कचरा फेकताना आढळल्यास 10 हजार दंड, परवानाही रद्द होणार; CM सावंतांचा इशारा

Goa Live News: खंडणी प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी ४ जणांना केली अटक

Goa Slums: गोव्यात 14 झोपडपट्ट्यांत सुमारे 27 हजार लोक! 2011ची आकडेवारी; संख्‍या बरीच मोठी असण्‍याची शक्‍यता

Betul: दारूच्या नशेत पोलिसांवर दगडफेक, लाथाबुक्क्यांनी मारहाण; 6 जणांची पोलिस कोठडीत रवानगी

SCROLL FOR NEXT