Goa Sports : दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी गोवा संघाला शुभेच्छा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात प्रवीण आर्लेकर व इतर Dainik Gomantak
क्रीडा

दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय ग्रेपलिंग स्पर्धेसाठी गोवा संघ रावाना

पेडणे मतदारसंघाचे मगो नेते तथा समाजसेवक प्रवीण आर्लेकर व इतर मान्यवरांनी दिल्या खेळाडूंना शुभेच्छा.

दैनिक गोमन्तक

मोरजी: दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय ग्रेपलिंग स्पर्धेसाठी गोवा संघ मंगळवारी रवाना झाला .पेडणे मतदारसंघाचे मगो नेते तथा समाजसेवक प्रवीण आर्लेकर व इतर मान्यवरांनी दिल्या खेळाडूंना शुभेच्छा. इंदिरा गांधी स्टेडियम दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली पहिली राष्ट्रीय ग्रेपलिंग स्पर्धा 20, 21 व 22 आॕक्टोबर असे तीन दिवस होणार आहे.या स्पर्धेसाठी नाॕगीच्या विविध वजनी गटात सहभागी होण्यासाठी गोव्याच्या 25 खेळांडूची शिकेरी मये येथे सराव शिबिर घेऊन निवड करण्यात आली होती.

गोव्याच्या संघात वैयक्तिक पुरुष गटात विराज तुकाराम वीर , परबिंदरा सुरेंद्र राजवर ,जयकांत लक्षी बारीक, अमिश कमलनाथ पाञा, शहिद जहिर फरिद्दिन,दिप्तेश दत्ता परब, साहील संदिप पेडणेकर, जाॕयल एन्टोनी ग्रासियस, साईप्रसाद सुधाकर वेळिप, लक्ष्मण रत्नाकांत सावंत, किसन बाबूराव गावस व केलिन फिलोनी कोल्याको व प्रशिक्षक सनी मोहिंदुरु (हरियाणा ) .

मुलीच्या विभागात शिल्पा फोंडू वेळिप, दिया धोलो वेळिप, गौतृमी जयवंत जुवेकर व रुक्मा सखाराम फाळे यांची निवड झाली. प्रशिक्षक म्हणून भावना चोडणकर तर मॕनेजर म्हाणून साधना हरमलकर यांची निवड झाली.

या संघासोबत गोवा ग्रेपलिंग संघटनेचे अध्यक्ष संदिप पेडणेकर , सरचिटणीस जयवंत बोभाटे , सचिव नारायण मराठे, कोषाध्यक्ष संजय म्हापसेकर, उत्तर गोवा उपाध्यक्ष शिवराम तुकोजी, उत्तर गोवा सचिव किशोर किनळेकर, सदस्य गौतम राऊळ, प्रताप देसाई, सदानंद कडोली , तांञिक अधिकारी तसेच इतर पदाधिकारी मिळून 35 जण रवाना झाले.

खेळाच्या आणि खेळाडूंच्या उत्कर्षासाठी आपण नेहमीच पुढे असणारः प्रवीण आर्लेकर

दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ग्रेपलिंग पहिल्या स्पर्धेसाठी गोव्याचा संघ खेळण्यासाठी जातो ही गोमंतकीयाच्या दृष्टीने आनंदाची बाब असून खेळाच्या उत्कर्षासाठी आणि खेळाडूंच्या उत्कर्षासाठी आपले नेहमीच सहकार्य असणार आहे. आपण आमदार म्हणून निवडून आल्यास खेळाडूंना आणि खेळाला नवचैतन्य निर्माण करणार असल्याचे मगो नेते प्रविण आर्लेकर म्हणाले .गोव्याच्या संघाने विजयी होऊन गोवा राज्याचे नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा यावेळी प्रवीण आर्लेकर यांनी खेळडूंना दिल्या. पेडणे येथे खेळडूंच्या संघाला निरोप देण्यासाठी आणि गणवेश वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने मगो नेते प्रविण आर्लेकर बोलत होते.

यावेळी गोवा राज्य ग्रेपलिंग असोसिएशनचे अध्यक्ष संदिप पेडणेकर, सरचिटणीस जयवंत बोबटे, सह सचिव नारायण मराठे, कोषाध्यक्ष संजय म्हापसेकर, उत्तर गोवा उपाध्यक्ष शिवराम तुकोजी, उत्तर गोवा सचिव किशोर किनळेकर, उत्तर गोवा खजिनदार महादेव गवंडी, सदस्य गौतम राऊळ, प्रताप देसाई, सदानंद कडोली , मगो कार्यकारिणी सदस्य सुदिप कोरगावकर , उपसरपंच सुबोध महाले, नरेश कोरगावकर देवानंद गावडे, आवेलिन राॕड्रिग्स, जयेश पालयेकर, महेश परब, देविदास नागवेकर , राजन म्हापसेकर आदी उपस्थित होते.

यावेळी संदिप पेडणेकर, सुबोध महाले, सुदिप कोरगावकर, आवेलिनो राॕड्रिग्स आदीनी यांनी खेळाडूना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रवीण आर्लेकर यांनी खेळाडूना दिलेले गणवेश यांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूञसंचालन किशोर किनळेकर यांनी केले. सरचिटणीस जयवंत बोबटे यांनी पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना गणवेश देऊन सहकार्य केल्याबद्दल प्रवीण आर्लेकर यांना धन्यवाद दिले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT