झुलते पूल ठरताहेत पर्यटकांचे आकर्षण

विविध क्‍लृप्‍त्‍या : पर्यटकांना खेचण्‍यासाठी व्‍यावसायिकांमध्‍ये चढाओढ
Goa Tourisam: झुलते पूल ठरताहेत पर्यटकांचे आकर्षण
Goa Tourisam: झुलते पूल ठरताहेत पर्यटकांचे आकर्षणDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी : कोरोना महामारीनंतर किनारी भागातील पर्यटन व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्‍यावसायिक विविध क्‍लृप्‍त्‍या आखत आहेत. आपल्या रेस्टॉरंटसाठी कोणी ग्राहक आणेल त्याच्यासाठी न्‍याहारी, दुपारचे जेवण, मद्य आणि जाताना काही रोख रक्कम देण्‍याची ‘‍स्‍कीम’ सध्‍या जोरदार सुरू आहे. त्‍यातच काही जणांनी आश्वे-मांद्रे किनारी पर्यटकांना आकर्षिक करण्‍यासाठी झुलते पूल उभारले आहेत. हे पूल पर्यटकांना आपल्‍याकडे खेचून घेत आहेत.

Goa Tourisam: झुलते पूल ठरताहेत पर्यटकांचे आकर्षण
भाजप सरकार त्‍वरित बरखास्त करा; काँग्रेसची मागणी

कोरोना महामारीने मागची दीड-दोन वर्षे पर्यटक व्‍यावसायिकांना जबरदस्‍त आर्थिक फटका बसला. आता नव्याने सुरू झालेल्‍या पर्यटन हंगामातही हा धोका कायम असला तरी परिस्‍थितीत सुधारणा होत आहे. त्‍यामुळे सरकारने काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्‍याचाच परिणाम म्‍हणून किनारी भागांत देशी-विदेशी पर्यटकांची संख्‍या वाढू लागली आहे. पेडणे तालुक्यातील मोरजी, आश्वे-मांद्रे, हरमल व किनारी भागांत सुट्ट्यांच्‍या दिवशी तर पर्यटकांची झुंबड उडाल्‍याचे पाहायला मिळते.

Goa Tourisam: झुलते पूल ठरताहेत पर्यटकांचे आकर्षण
‘व्हिजनरी’च्या गुंतवणूकदारांना मदत करा;आलेक्स रेजिनाल्ड

झुलता पूल ठरतोय ‘सेल्‍फी स्‍थान’:

आश्वे-मांद्रे किनारी भागातील जुनस नदीवर समुद्र किनारी जाण्यासाठी लाखो रुपये खर्चून खासगी पातळीवर झुलता लाकडी पूल तयार करण्‍यात आला आहे. या पुलाचे पर्यटकांना आकर्षण वाटत आहे. काही पर्यटक या पुलावरून फोटो काढतात, सेल्‍फी काढतात. आश्वे-मांद्रे जुनस नदीपलीकडे अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. समुद आणि मुख्य रस्त्याच्या जवळूनच जुनस नदी वाहते. अलीकडेच या नदीवर पूल उभारण्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्‍यक्ष तथा आमदार दयानंद सोपटे यांनी पायाभरणी केली होती. मात्र हे काम रखडलेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com