Goa: Flag off of the walkathon race for Sports and Fitness Week by Bruno Coutinho, Director Coaching, Goa Sports Authority. Dainik Gomantak
क्रीडा

Goa : तंदुरुस्ती सप्ताहाच्या सुरवातीस क्रीडा चुरस

Goa : बांबोळी येथे विविध स्पर्धांचे आयोजन

दैनिक गोमंतक

पणजीः गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या (Sports Authority of Goa) क्रीडा आणि तंदुरुस्ती सप्ताहास (Sports and Fitness week) शुक्रवारी सुरवात झाली. पहिल्याच दिवशी बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर (Bambolim Athletics Stadium) जोरदार चुरस अनुभवण्यास मिळाली. गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई, प्रशिक्षण संचालक ब्रुनो कुतिन्हो, प्रकल्प अधिकारी मोनिका दोरादो, कार्यकारी अभियंता जयकृष्ण तिळवे आणि दीपक लोटलीकर यांची क्रीडा व तंदुरुस्ती सप्ताहाच्या उद्‍घाटनास उपस्थिती होती. गोवा क्रीडा प्राधिकरणाचे विभाग 6 प्रमुख नीलेश नाईक व सहाय्यक प्रकल्प अधिकारी स्टेफी कार्दोझ यांनी स्वागत केले. तंदुरुस्तीसाठी प्रत्येकाने दरदिवशी किमान तीस ते साठ मिनिटे शारीरिक उपक्रम करणे गरजेचे असल्याचे मत प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले.

विविध स्पर्धांचे निकाल

एक किलोमीटर मिनी वॉकेथॉन (पुरुष) ः मॅक्सन फर्नांडिस, हरीष पार्सेकर, विजय कुमार, १ किलोमीटर मिनी वॉकेथॉन (महिला) ः मॅक्झिलिया गोविस, सूरत गावस, मिलाग्रिना मस्कारेन्हास, प्लँक चॅलेंज (पुरुष) ः राजेश नाईक (14 मिनिटे 34 सेकंद), चितंबरम नाईक (14 मिनिटे 04 सेकंद), वामन चोपडेकर (12 मिनिटे 23 सेकंद). 1 मिनिट स्किपिंग चॅलेंज (महिला) ः मारिया रिबेलो (179 स्किप्स), देवी गावकर (174 स्किप्स), स्नेहल पवार (162 स्किप्स), गोळाफेक (पुरुष) ः मुकेश महाले (11.08 मीटर), अँथनी परेरा (10.10 मीटर), कैलाश गावकर (9.86 मीटर), गोळाफेक (महिला) ः वालंकी दुमासकर (8.26 मीटर), कॉनी रॉड्रिग्ज (7.07 मीटर), मोनिका आल्मेदा (6.50 मीटर).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT