Mitchell Lobo with the winning team at the football tournament at Siolim. Goa Dainik Gomantak
क्रीडा

Goa: शिवोलीत दर्जेदार फुटबॉल मैदानाची गरज: मंत्री मायकल लोबो

शिवोलीतील मैदान सुसज्ज बनवण्यासाठी मंत्री लोबो प्रयत्नशील (Goa)

Santosh Govekar

फुटबॉलसाठी (Football Tournament) गोव्याच्या तसेच जगात प्रसिद्ध असलेल्या शिवोलीत दर्जेदार क्रिडांगणाची गरज आहे (Quality Football Ground), या भागातील फुटबॉल खेळाडूंसाठी (Footballer from Siolim) उपलब्ध असलेले मैदान चर्च संस्थेकडून सहकार्य मिळाल्यास आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रणांच्या (Modern Technology and System) साहाय्याने दर्जेदार बनवणे शक्य आहे. स्थानिक पंचायत आणि चर्च संस्थेचे सहकार्य लाभल्यास पर्राच्या धर्तीवर शिवोलीतील मैदान सुसज्ज बनवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो (Calangute MLA & Minister Michel Lobo) यांनी शिवोलीत सांगितले. शिवोली बॉयज आयोजित ऑल गोवा फुटबॉल (Siolim Boys Organised Football Tournament) सामन्याच्या शेवटच्या दिवशी विजेत्यांना बक्षिसे प्रदान करतेवेळी मंत्री लोबो बोलत होते. (Goa)

यावेळी मार्ना शिवोली पंचायतीचे उप सरपंच विलीयम फर्नांडिस, माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य सिल्वेस्टर फर्नांडिस, विघ्नेश चोडणकर, वायंगणकर, बाबुसो उर्फ दायलो वायंगणकर, गजानन तिळवे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी फुटबॉल स्पर्धेतील विनोद -107 (कोरगांव) यांना रोख तीस हजार आणी चषक तर उप-विजेत्या सिद्धीविनायक ओवळेश्वर ब्रदर्स संघास वीस हजार रुपये रोख आणी चषक मंत्री लोबो यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. बेस्ट गोलरक्षक विनोद आणी बेस्ट स्ट्रायकर श्रीधर यांनाही यावेळी वैयक्तिक बक्षिसाने गौरविण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT