ranji trophy 2023 Dainik Gomantak
क्रीडा

Goa Ranji Trophy : गोव्याच्या रणजी क्रिकेट संघाला कर्नाटकचा ‘आधार’

दोन दशकांत सहा खेळाडू ः तिघांचे थेट पदार्पण, फक्त दोघेच क्रिकेटपटू खेळले लागोपाठ मोसम

किशोर पेटकर

किशोर पेटकर

Goa Ranji Trophy : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसह विजय हजारे करंडक एकदिवसीय आणि सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेत यंदा कर्नाटकचे दोघे जण गोव्याच्या सीनियर क्रिकेट संघाच्या फलंदाजीला आधार देणार आहेत. दोन दशकांच्या कालावधीत सहा कर्नाटकी क्रिकेटपटूंनी गोव्याचे प्रतिनिधित्व केले, त्यापैकी फक्त दोघेच एकपेक्षा जास्त मोसम खेळू शकले.

आगामी २०२३-२४ मोसमात आपण गोव्यातर्फे खेळणार असल्याचे ३० वर्षीय केव्ही सिद्धार्थ व २९ वर्षीय रोहन कदम यांनी बंगळूर येथे सांगितले. गोवा क्रिकेट असोसिएशनकडून लवकरच त्यांच्या कराराची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा ढाचा २००१-०२ नंतर बदलण्यात आला. २००२-०३ पासून एलिट-प्लेट गटात स्पर्धा खेळली जाऊ लागली. तेव्हापासून गोव्यातर्फे कर्नाटकचे सहा खेळाडू खेळले आहेत.

डी. सी. राजेश (२००३-०४), मनोज मल्होत्रा (२००४-०५) व रायन निनान (२००८-०९) यांनी थेट गोव्याकडून रणजी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले, पण ते एकच मोसम खेळू शकले. याशिवाय सोमशेखर शिरगुप्पी हा कर्नाटकचा अनुभवी खेळाडू गोव्याकडून २००३-०४ मोसमात खेळला होता.

रॉजर बिन्नी गोव्याचे माजी खेळाडू

१९८३ साली विश्वकरंडक जिंकलेल्या भारतीय संघाचे माजी अष्टपैलू रॉजर बिन्नी कर्नाटक संघाचे आधारस्तंभ, ते सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष आहेत.

१९९१-९२ मध्ये ते कारकिर्दीतील शेवटचा मोसम गोव्याचा कर्णधार या नात्याने खेळले. गोव्याकडून पाच सामन्यांत त्यांनी ३८.४४च्या सरासरीने एक शतक व दोन अर्धशतकांसह ३४६ धावा केल्या, तसेच तीन गडीही बाद केले.

एकपेक्षा जास्त मोसम

कर्नाटकचा माजी सलामीवीर जे. अरुणकुमार दोन मोसम (२००७-०८, २००८-०९) गोव्याकडून खेळला, पण दुसरा मोसम फलंदाजीतील सूर हरपल्यामुळे त्याला अर्धावरच सोडावा लागला. त्या मोसमात त्याला सात डावांत फक्त ७० धावाच करता आल्या.

अरुणकुमारने गोव्याचे नेतृत्वही केले. त्याने ९ रणजी सामन्यांत २१.६४च्या सरासरीने दोन अर्धशतकांसह ३०३ धावा केल्या.

कर्नाटकचा माजी अष्टपैलू अमित वर्मा याने तीन मोसम गोव्याचे प्रतिनिधित्व केले. अमित गोव्याच्या संघात असताना २०२०-२१ मोसमात रणजी स्पर्धा झाली नाही, कोविड-१९ महामारीमुळे देशांतर्गत मोसम फक्त एकदिवसीय आणि टी-२० स्पर्धेपुरता मर्यादित राहिला.

२०१८-१९ व २०१९-२० या दोन मोसमातील रणजी स्पर्धेत त्याने एकूण १९ लढतीत १३९७ धावा करताना ६ शतके व ६ अर्धशतके नोंदविली, तसेच लेगस्पिनने ५६ गडी बाद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT