Vasco SC Player Denvil Fernandes Dainik Gomantak
क्रीडा

Goa Professional Football League: गार्डियन एंजल क्लबचा वास्कोला धक्का; 2-1 फरकाने जिंकला सामना

सामन्याच्या भरपाई वेळेतील गोल ठरले निर्णायक

किशोर पेटकर

Guardian Angel SC Win Against Vasco SC: सामन्याच्या भरपाई वेळेतील खेळात गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबने दोन गोल नोंदवून प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत माजी विजेत्या वास्को स्पोर्टस क्लबला शुक्रवारी पराभवाचा धक्का दिला. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झालेला सामना कुडचडेच्या संघाने 2-1 फरकाने जिंकला.

गार्डियन एंजल क्लबने दोन्ही गोल भरपाई वेळेत केले आणि पराभवाच्या खाईतून विजयाला अनपेक्षितपणे गवसणी घातली.

ज्योएल बार्रेटो याने बरोबरीचा गोल केल्यानंतर गिल्बर्ट ऑलिव्हेरा याच्या गोलमुळे गार्डियन एंजल क्लबने विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले. त्यापूर्वी डेन्विल फर्नांडिस याच्या गोलमुळे वास्को क्लबने एका गोलची आघाडी प्राप्त केली होती.

मात्र पेनल्टी फटक्यासह गमावलेल्या संधीही वास्को येथील संघासाठी नुकसानकारक ठरल्या. सामन्याच्या सुरवातीस गार्डियन एंजल क्लबच्या जॉयविन कॉस्ता याने गोल केला होता, पण तो हँडबॉल ठरल्याने अवैध ठरविण्यात आला.

गोलशून्य पूर्वार्धानंतर ६५व्या मिनिटास सामन्यातील पहिला गोल झाला. डेन्विलच्या सणसणीत फटक्यासमोर गार्डियन एंजल क्लबचा गोलरक्षक ऑस्विन रॉड्रिग्ज हतबल ठरला. त्यानंतर डेन्विलचा धोकादायक प्रयत्न गोलरक्षक ऑस्विन याने उधळून लावल्यामुळे वास्को क्लबची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली.

वास्को क्लबला पुन्हा आघाडी वाढविण्याची नामी संधी मिळाली होती, मात्र पेनल्टी फटक्यावर राफेल फर्नांडिस याने फटका चुकीच्या दिशेने मारला.

सनसनाटी पुनरागमन

गार्डियन एंजल क्लबने भरपाई वेळेत सनसनाटी पुनरागमन केले. ९०+१व्या मिनिटास ज्योएल बार्रेटोने खोलवर मुसंडी मारत गोलरक्षक जागा सोडून पुढे आल्याची संधी आयती साधली.

नंतर गिल्बर्ट ऑलिव्हेराने झंझावाती थेट फ्रीकिक फटक्यावर संघाची आघाडी २-१ अशी निर्णायक ठरविली.

शनिवारचा सामना

चर्चिल ब्रदर्स विरुद्ध जीनो स्पोर्टस क्लब

स्थळ : धुळेर-म्हापसा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT