Goa Pro League Dainik Gomantak
क्रीडा

साळगावकर एफसीच्या खात्यात पूर्ण गुण

डॅरीलच्या गोलमुळे कळंगुट असोसिएशनवर निसटती मात

Dainik Gomantak

Goa Pro League: सामन्याच्या पूर्वार्धात डॅरील कॉस्ता याने नोंदविलेल्या गोलमुळे माजी विजेत्या साळगावकर एफसीने (Salgaonkar FC) बुधवारी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत पूर्ण तीन गुणांची कमाई केली. त्यांनी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर कळंगुट असोसिएशनला (Calangute Association) 1-0 फरकाने निसटते हरविले.

डॅरीलने सामन्याच्या 33व्या मिनिटास गोल केला, त्यामुळे साळगावकरला स्पर्धेतील पहिला विजय नोंदविता आला. त्यांचे आता दोन लढतीनंतर चार गुण झाले आहेत. कळंगुटला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. साळगावकरने सामन्यावर वर्चस्व राखले, पण सदोष नेमबाजी आणि कळंगुटच्या बचावफळीची दक्षता यामुळे त्यांना मोठ्या फरकाने विजय नोंदविता आला नाही.

डॅरीलचा अगोदरचा प्रयत्न कळंगुटचा गोलरक्षक प्रेस्ली मस्कारेन्हास याने उधळून लावला, मात्र नंतर गोलरक्षकाने जागा सोडल्याची संधी साळगावकरच्या खेळाडूने हेरली आणि अचूक फटका मारत संघाला आघाडीवर नेले. विश्रांतीपूर्वी साळगावकर संघाला फ्रीकिक फटका मिळाला, पण त्याला लाभ उठवता आला नाही.

वास्कोची गाठ वेळसाव क्लबशी

गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेत विजय व बरोबरी अशा कामगिरीसह चार गुण नोंदविलेला वास्को स्पोर्टस क्लब गुरुवारी सलग दोन सामने गमावलेल्या वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबविरुद्ध खेळेल. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: पंतप्रधान मोदींनी दिल्या गोवा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा

Goa ZP Election: भाजप-मगोसमोर भाटीकरांचे आव्हान? कुर्टी झेडपीसाठी ‘आप’सह काँग्रेसही रिंगणात; फोंडा पोटनिवडणुकीवर डोळा

Goa Politics: खरी कुजबुज; रवी पुत्रांचा अप्रत्यक्ष इशारा!

'मृतांमध्ये आमच्या 20 कर्मचाऱ्यांचा जीव गेला याचे दुःख'! लुथरा बंधूंनी पोलिसांसमोर मांडली बाजू; महिन्याला 25 लाख हफ्ता देत असल्याची चर्चा

Cabo De Rama Khol: ‘खोल’ टेकडीचा 2012 पासून खुलेआम विध्वंस! प्रशासन गांधारीच्‍या भूमिकेत; CRZ प्राधिकरणाच्‍या प्रकार लक्षात आणूनही दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT