Goa Police Cup शिरसई : सामनावीर पुरस्कार स्वीकारताना पणजी फुटबॉलर्सचा इरफान यादवाड (डावीकडे). Dainik Gomantak
क्रीडा

Goa Police Cup Football स्पर्धेत पणजी फुटबॉलर्सचा उपांत्य फेरीत प्रवेश

गार्डियन एंजलवर मात; पेनल्टी शूटआऊटवर कळंगुटचा चर्चिल ब्रदर्सला धक्का

दैनिक गोमन्तक

पणजी : धडाकेबाज खेळ केलेल्या इरफान यादवाड याच्या चार गोलच्या बळावर पणजी फुटबॉलर्सने (Football) 17 व्या गोवा पोलिस कप फुटबॉल (Goa Police Cup Football) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी सोमवारी गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबवर 5-2 फरकाने मात केली. सामना शिरसई मैदानावर झाला.स्पर्धेतील आणखी एका सामन्यात पेनल्टी शूटआऊटवर कळंगुट असोसिएशनने चर्चिल ब्रदर्सला 8-7 फरकाने पराभवाचा धक्का देत शेवटच्या चार संघांत स्थान मिळविले.

सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. गार्डियन एंजलविरुद्ध पणजी फुटबॉलर्स संघ विश्रांतीला 2-1 फरकाने आघाडीवर होता. इरफानने चारपैकी दोन गोल पूर्वार्धात नोंदविले. पहिला गोल 12व्या, तर दुसरा गोल 37 व्या मिनिटास केला. त्यापूर्वी जॉन्सन होर्ता याने २१व्या मिनिटास गार्डियन एंजलला बरोबरी साधून दिली होती. 68व्या मिनिटास जॉयसन गांवकार याने पणजी फुटबॉलर्सची आघाडी 3-1 अशी मजबूत केल्यानंतर इरफानने अनुक्रमे 73 व 90 व्या मिनिटास गोलची भर टाकली. 90 +1 व्या मिनिटास निकोलस रॉड्रिग्जने गार्डियन एंजलची पिछाडी 2-5 अशी कमी केली.

कळंगुटची पिछाडीवरून मुसंडी

धुळेर स्टेडियमवर निर्धारित वेळेतील 2-2 गोलबरोबरीनंतर कळंगुट असोसिएशनने बाजी मारली. विशेष बाब म्हणजे, पूर्वार्धातील दोन गोलच्या पिछाडीवरून कळंगुटने विजयी मुसंडी मारली. सामन्याच्या सहाव्या मिनिटास ब्राईस मिरांडा याने गोल केल्यानंतर, 15व्या मिनिटास विकास याने पेनल्टी फटक्यावर चर्चिल ब्रदर्सची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. हर्षद नाईक याने ३०व्या मिनिटास कळंगुटची पिछाडी 1-2 अशी कमी केल्यानंतर मोझेस डिसा याने 52व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे कळंगुटने बरोबरी साधली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: त्रिकोणी प्रेमाचा रक्तरंजित शेवट: गर्भवती महिलेची चाकूने वार करून हत्या, खुनी आधीचा लिव्ह-इन पार्टनर, नंतर पतीने खुनीचा काढला काटा

Horoscope: हा आठवडा आव्हानात्मक! 'या' 3 राशींसाठी कामावर सावधगिरी आवश्यक, अन्यथा नुकसानं पक्कं

"माझे वडील वाचले, कारण रवी नाईक!" - मंत्री विश्वजीत राणे भावूक; Watch Video

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

Ravi Naik: रवींना 'मगो'चे नेतृत्व मिळाले असते तर...?

SCROLL FOR NEXT