Goa Womens Cricket  Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याला कामगिरी उंचावण्याची संधी

शिखाच्या नेतृत्वाखालील सीनियर महिला संघाचे सामने 31 पासून

Dainik Gomantak

Goa: सीनियर महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट (Womens ODI Cricket) स्पर्धेत एलिट ड गटात कामगिरी उंचावण्याचे लक्ष्य बाळगून अनुभवी कसोटीपटू शिखा पांडे (Captain Shikha Pandey) हिच्या नेतृत्वाखालील संघ शनिवारी विशाखापट्टणमला रवाना होईल. सामने ३१ ऑक्टोबरपासून खेळले जातील, त्यापूर्वी संघ स्पर्धास्थळी कोविड-१९ विलगीकरण प्रक्रियेत असेल.

गोव्याने गतमोसमातील मोहिमेत, यावर्षी मार्चमध्ये जयपूर येथे झालेल्या एकदिवसीय स्पर्धेत एलिट क गटात पाचपैकी तीन सामने जिंकले होते, तर दोन लढतीत पराभव पत्करावा लागला होता. गोव्याने चंडीगड, राजस्थान, उत्तर प्रदेशला नमविले होते, तर महाराष्ट्र व आंध्रविरुद्ध पराभव पत्करावे लागले होते. आता यावेळच्या मोहिमेत गोव्याच्या महिला संघासमोर गुजरात, हरियाना, मध्य प्रदेश, विदर्भ व मिझोरामचे आव्हान असेल. मिझोरामवगळता इतर प्रतिस्पर्धी तुल्यबळ आहेत. गोव्याने कामगिरी उंचावला, तर निश्चितच संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्रता मिळवू शकतो.

गतमोसमात चमक

कर्णधार शिखा पांडेसह सुनंदा येत्रेकर, तेजस्विनी दुर्गड. संजुला नाईक, पूर्वजा वेर्लेकर, विनवी गुरव, रूपाली चव्हाण, निकिता मळीक या अनुभवी खेळाडूंवर गोव्याची अधिकांश मदार राहील. संघातील नवोदित खेळाडूंना छाप पाडण्याची संधी राहील. गतमोसमात तेजस्विनीने महाराष्ट्राविरुद्ध शानदार अर्धशतक नोंदविले होते. तिने अष्टपैलू चमक दाखविताना सहा विकेट टिपल्या होत्या. गोलंदाजीत सुनंदा येत्रेकरने राजस्थानविरुद्ध डावात पाच गडी बाद करताना किमया साधताना तीन सामन्यांत आठ गडी बाद केले. शिखाने प्रभावी मारा करताना सहा विकेट मिळविल्या होत्या. शिखा गोव्यासाठी फलंदाजीतही आधारस्तंभ असेल. फिरकी गोलंदाज रूपालीने आठ गडी बाद केले होते.

‘‘शिखा पांडेच्या आगमनामुळे संघाची ताकद वाढली आहे. खेळाडूंनी मोसमपूर्व शिबिरात खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे निश्चितच चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. गतमोसमातही गोव्याने तीन सामने जिंकून छाप पाडली होती. स्पर्धेतील प्रत्येक सामना जिंकण्याचे संघाचे ध्येय आहे.’’

- प्रकाश मयेकर, जीसीए प्रशिक्षण संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचं आमिष; मांगोरहिल येथील महिलेला 12.86 लाखांचा गंडा, महाराष्ट्रातील 4 जणांवर गुन्हा दाखल

Goa Winter Updates: राज्यात थंडीचा कडाका वाढला

Lionel Messi In India: 3 दिवस, 4 शहरं… मेस्सी भारत दौऱ्यावर! कधी, कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात उपस्थित राहणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

Watch Video: संघ हरला म्हणून राग आला, चाहत्यांनी स्टेडियमच पेटवलं; क्षणात सगळं जळून खाक, आग लावणारे 15 वर्षांखालील मुलं

SCROLL FOR NEXT