CK Nayudu Trophy Dainik Gomantak
क्रीडा

CK Nayudu Trophy: गोव्याने आघाडीची संधी दवडली

सी. के. नायडू क्रिकेट ः शेवटच्या जोडीने किल्ला लढविल्याने केरळचे पारडे जड

दैनिक गोमन्तक

केरळच्या शेवटच्या जोडीने चिवटपणे किल्ला लढवत संघाला आघाडी मिळवून दिली, त्यामुळे कर्नल सी. के. नायडू करंडक (25 वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेतील अनिर्णित लढतीत अखेर गोव्याला एका गुणावर समाधान मानावे लागले. चार दिवसीय सामना अळूर-बंगळूर येथे झाला.

केरळने पहिल्या डावात नववी विकेट गमावली तेव्हा गोव्याचा संघ 18 धावांनी पुढे होता. मात्र टी. निखिल व एफ. फानूस यांनी सावधपणे फलंदाजी करत केरळला गोव्याची धावसंख्या करून दिली. केरळने पहिल्या डावात 495 धावा करून 41 धावांची आघाडी प्राप्त केली. सामन्याच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी औपचारिक ठरलेल्या दुसऱ्या डावात गोव्याने 4 बाद 113 धावा केल्या. त्यांनी पहिल्या डावात 454 धावा केल्या होत्या.

अनिर्णित लढतीतून केरळला पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मिळाले. गोव्याचा स्पर्धेतील पुढील सामना 29 मार्चपासून उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला जाईल. एलिट एफ गटातील आणखी एका लढतीत उत्तर प्रदेशने चुरशीच्या लढतीत हिमाचल प्रदेशवर चार धावांनी मात करून सहा गुण मिळविले.

महत्त्वपूर्ण भागीदारी

सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर गुरुवारी केरळने 6 बाद 413 धावा केल्या होत्या व ते 41 धावांनी मागे होते. शुक्रवारी सकाळी कर्णधार दीपराज गावकर व ऋत्विक नाईक यांनी प्रभावी मारा केला, त्यामुळे केरळने 13 धावांत 3 गडी बाद गमावले व गोव्याला आघाडीची संधी प्राप्त झाली. 9 बाद 436 वरून निखिल (नाबाद 36) व फानूस (26) यांच्यामुळे केरळच्या संघाला आघाडी घेता आली. या जोडीने शेवटच्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. फानूसला त्रिफळाचीत बाद करून विश्वंबर काहलोन याने केरळचा डाव संपविला. केरळच्या डावात सोडलेले झेल गोव्यासाठी खूपच महाग ठरले.

गोव्याच्या कर्णधाराची अष्टपैलू चमक

गोव्याचा कर्णधार दीपराज गावकर याची अष्टपैलू कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने पहिल्या डावात शतक ठोकताना 114 धावा केल्या, नंतर मध्यमगती गोलंदाजीने छाप पाडताना केरळचे 6 गडी 85 धावांत बाद करून सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. त्याने दुसऱ्या डावातही सर्वाधिक 34 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव: 454 व दुसरा डाव: 44 षटकांत 4 बाद 113 (ईशान गडेकर 18, मंथन खुटकर 27, विश्वंबर काहलोन 3, तुनीष सावकार नाबाद 25, दीपराज गावकर 34, सोहम पानवलकर नाबाद 1, एन. पी. बासिल 2-30, अखिल स्कारिया 1-20, श्रीहरी नायर 1-28).

केरळ, पहिला डाव (6 बाद 413 वरून): 134.1 षटकांत सर्वबाद 459, (पी. ए. अब्दुल बाझिथ 45, टी. निखिल नाबाद 36, एफ. फानूस 26, समित आर्यन मिश्रा 22-2-87-0, ऋत्विक नाईक 37-11-116-2, दीपराज गावकर 26-4-85-6, मोहित रेडकर 27-5-98-1, बलप्रीतसिंग छड्डा 16-0-72-0, विश्वंबर काहलोन 4.1-1-14-1, तुनीष सावकार 2-0-3-0).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT