Wicketkeeper-batsman Soham Panwalkar
Wicketkeeper-batsman Soham Panwalkar Kishor Petkar
क्रीडा

सोहमच्या शतकामुळे गोवा सुस्थितीत

दैनिक गोमन्तक

पणजी : यष्टिरक्षक-फलंदाज सोहम पानवलकर (११९) याने प्रेक्षणीय शतक झळकवताना मोहित रेडकरच्या (८९) साथीत केरळच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवत सातव्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी केली, त्यामुळे कर्नल सी. के. नायडू करंडक (२५ वर्षांखालील) क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी बुधवारी गोव्याला सुस्थिती गाठता आली. ४५४ धावांना उत्तर देताना केरळने दिवसाअखेर २ बाद १४९ धावा अशी सुरवात केली. (Goa is in good condition due to the century of Soham Panwalkar)

अळूर-बंगळूर येथे सुरू असलेल्या या चार दिवसीय सामन्याचा दुसरा दिवस सोहम व मोहित यांनी गाजविला. गोव्याचा (Goa) कर्णधार दीपराज गावकरने (११४) काल शतक केले होते. त्यानंतर सोहम डावातील दुसरा शतकवीर ठरला. गोव्याचा डाव संपल्यानंतर केरळला (Kerala) जे. अनंतकृष्णन व आनंद कृष्णन यांनी आक्रमक शैलीत ७२ धावांची सलामी दिली. मध्यमगती ऋत्विक नाईकच्या गोलंदाजीवर (bowling) यष्टिरक्षक (Wicketkeeper) सोहमने आनंदचा (३७) झेल पकडला. फिरकी गोलंदाज मोहित रेडकरच्या गोलंदाजीवर सोहमने प्रतिस्पर्धी कर्णधार वत्सल (१५) याला यष्टिचीत बाद केले. नंतर अर्धशतकवीर अनंतकृष्णन (६९) व शॉन रॉजर (२१) या नाबाद फलंदाजांनी संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. केरळचा संघ अजून ३०५ धावांनी मागे आहे.

१५४ धावांची दमदार भागी

गोव्याने कालच्या ६ बाद २९६ वरून पुढे खेळण्यास सुरवात केल्यानंतर बुधवारी सकाळच्या सत्रात सोहम व मोहितने केरळच्या गोलंदाजांना दाद दिली नाही. त्यांनी आक्रमक फलंदाजी (Batting) केल्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाज भांबावले. या जोडीने सातव्या विकेटसाठी २४७ चेंडूंत १५४ धावांची दमदार भागीदारी केली. सोहम काल दिवसअखेर ५१ धावांवर नाबाद होता. मोहितला साथीला घेत त्याने बुधवारी संघाला मजबूत धावसंख्या गाठून दिली.

उपाहारानंतर शतकाला ११ धावा हव्या असताना मोहितची एकाग्रता भंगली आणि जम बसलेली जोडी फुटली. मोहितने आक्रमक फलंदाजी करताना १२१ चेंडूंत १२ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ८९ धावा केल्या. नंतर गोव्याने ३२ धावांत ४ गडी गमावल्यामुळे डाव संपुष्टात आला. शेवटच्या ३ विकेट १३ धावात गारद झाल्या. संघाच्या साडेचारशे धावा झाल्यानंतर सोहम बाद झाला. त्याने २५१ चेंडूंतील खेळीत १५ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ११९ धावा केल्या. त्याचे हे बीसीसीआय (BCCI)स्पर्धेतील पहिले शतक ठरले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव (६ बाद २९६ वरून) : १४० षटकांत सर्वबाद ४५४ (सोहम पानवलकर ११९, मोहित रेडकर ८९, ऋत्विक नाईक ८, बलप्रीतसिंग छड्डा नाबाद ७, समित आर्यन मिश्रा ०, एनपी बासिल ३-११६, एफ. फनूस १-७१, अखिल स्कारिया २-५९, श्रीहरी नायर ३-११८, पीए अब्दुल बाझिथ १-६६).

केरळ, पहिला डाव : ३२ षटकात २ बाद १४९ (जे. अनंतकृष्णन नाबाद ६९, आनंद कृष्णन ३७, वत्सल १५, शॉन रॉजर नाबाद २१, समित आर्यन मिश्रा ९-१-३८-०, ऋत्विक नाईक ९-१-३८-१, दीपराज गावकर २-०-२०-०, मोहित रेडकर ७-२-३१-१, बलप्रीतसिंग छड्डा ३-०-७-०, विश्वंबर काहलोन २-०-१०-०).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सरकारी यंत्रणेचा वापर; युरी आलेमाव यांचा आरोप

Lok Sabha Election 2024: सोशल मीडियावरही ‘व्होटिंग फिव्हर’; राज्यातील तरुणाईने साजरा लोकशाहीचा उत्सव

Lok Sabha Election 2024: ''वाढीव टक्का, भाजपचा विजय पक्का''; काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT