Goa Football: Sporting Club The Goa Win Dainik Gomantak
क्रीडा

Goa Football: स्पोर्टिंग क्लब फुटसालमध्ये विजेता

अंतिम लढतीत आंबेली क्लबवर 9-1 फरकाने लीलया मात

Dainik Gomantak

Goa Football: स्पोर्टिंग क्लब द गोवा (Sporting Club The Goa Win) संघाने आंबेली स्पोर्टस क्लबचा (Ambeli Sport Club) 9-1 फरकाने धुव्वा उडवून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (GFA) पहिल्या राज्यस्तरीय फुटसाल स्पर्धेत (State level Footsal Compitation) विजेतेपद पटकाविले. अंतिम सामना घोगळ-मडगाव येथील चौगुले फुटसाल कोर्टवर झाला.

आंबेलीने पूर्वार्धात स्पोर्टिंगला झुंजविले, त्यामुळे गोलफलक कोराच राहिला. उत्तरार्धात स्पोर्टिंगने आक्रमक खेळाने आंबेलीस निष्प्रभ केले. विश्रांतीनंतरच्या पहिल्याच मिनिटास लॉईड कार्दोझने स्पोर्टिंगला आघाडी मिळवून दिल्यानंतर पाच मिनिटांच्या फरकात त्याने आणखी दोन गोल करून स्पोर्टिंगची बाजू भक्कम केली. मार्कुस मस्कारेन्हासने दोन गोल केल्यानंतर लॉईडने आणखी दोन गोल नोंदविले. उत्तरार्धातील नऊ मिनिटांच्या खेळात स्पोर्टिंगपाशी सात गोलांची मजबूत आघाडी जमा झाली. नंतर ॲल्टन वाझ व क्लाईव्ह मिरांडा यांनी प्रत्येकी एक गोल केला. लिंडन कार्दोझने आंबेलीची पिछाडी एका गोलने कमी केली.

गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आमदार चर्चिल आलेमाव, उपाध्यक्ष अँथनी पांगो, फुटसाल व बीच फुटसाल समितीचे अध्यक्ष बाबली मांद्रेकर, सहअध्यक्ष जॉन सिल्वा, सुकूर वाझ व जीएफए कार्यकार समिती सदस्यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

थोडक्यात महत्वाचे:

- राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्यामुळे स्पोर्टिंग क्लब आता अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या राष्ट्रीय फुटसाल मुख्य फेरीसाठी पात्र

- स्पोर्टिंगचा लॉईड कार्दोझ अंतिम सामन्याचा मानकरी

- स्पोर्टिंगचा मार्कुस मस्कारेन्हास उत्कृष्ट स्ट्रायकर, ओझेन सिल्वा उत्कृष्ट गोलरक्षक, क्लाईव्ह मिरांडा उत्कृष्ट बचावपटू

- विजेत्या स्पोर्टिंग क्लबला 30,000 रुपये, तर उपविजेत्या आंबेली क्लबला 20,000 रूपये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तानने जाहीर केला संघ, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT