Goa Football: Tejas Nagvenkar Dainik Gomantak
क्रीडा

Goa Football: गोव्याचे तेजस देशातील सर्वोत्कृष्ट फुटबॉल रेफरी

Goa Football: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमातील अंतिम लढतीतील मुख्य रेफरी या नात्याने तेजस यांनी जबाबदारी पेलली होती.

किशोर पेटकर

पणजी ः गोमंतकीय फुटबॉल रेफरी (Football Referee) तेजस नागवेकर (Tejas Nagvenkar) यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (All India Football Federation) 2020-2021 मधील देशातील सर्वोत्कृष्ट फुटबॉल रेफरी पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्याबद्दल त्यांचे गोवा फुटबॉल असोसिएशनने (Goa Football Association) अभिनंदन केले आहे. इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमातील अंतिम लढतीतील मुख्य रेफरी या नात्याने तेजस यांनी जबाबदारी पेलली होती. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर यावर्षी 13 मार्च रोजी झालेल्या मुंबई सिटी आणि एटीके मोहन बागान यांच्यातील अंतिम लढतीत तेजस मुख्य रेफरी होते. त्यामुळे तेजस यांना आयएसएल स्पर्धेच्या अंतिम लढतीत पंचगिरी करणारे पहिले भारतीय रेफरी हा मान मिळाला होता. फिफाची मान्यता असलेले तेजस हे सध्याचे एकमेव गोमंतकीय फुटबॉल रेफरी आहेत.

देशातील उत्कृष्ट फुटबॉल रेफरी पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल तेजस यांचे गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आमदार चर्चिल आलेमाव यांनी अभिनंदन केले आहे. तेजस यांनी गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. ``ही फार मोठी मान्यता आहे. तेजस यांनी यश प्राप्त करताना मेहनत, चिकाटी प्रदर्शित केली आहे,`` असे आलेमाव यांनी गोमंतकीय रेफरीस शाबासकी देताना सांगितले. जीएफए रेफरी व सहाय्यक रेफरी समितीचे अध्यक्ष ग्रेगरी डिसोझा, समितीचे सदस्य मॉरिसियो आल्मेदा, फ्रँकी फर्नांडिस यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

Goa Shipyard Blast: लोटली स्फोटातील मृतांची संख्या वाढली; शिपयार्ड सील, सुरक्षा अधिकाऱ्याला अटक!

Asim Munir: पाकचे सैन्य प्रमुख आसिम मुनीरने पुन्हा ओकली गरळ; भारताला दिली अणुयुद्धाची धमकी Watch Video

Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! एसी कोचमध्ये स्वच्छतेवर भर; प्रवाशांना मिळणार कव्हर घातलेले ब्लँकेट

SCROLL FOR NEXT