Goa Swimming Dainik Gomantak
क्रीडा

Goa : राज्यात जलतरण अकादमीसाठी प्रयत्न

Goa : संघटनेचे अध्यक्ष आमदार दिगंबर कामत यांच्याकडून पाठपुरावा

Kishor Petkar

पणजी : सरकारच्या एक राज्य एक खेळ (जलतरण) या धोरणानुसार गोव्यात व्यावसायिक जलतरण अकादमीसाठी (Swimming Academy) प्रयत्न सुरू असून याकामी गोवा जलतरण संघटनेचे (Goa Swimming Association) अध्यक्ष आमदार दिगंबर कामत (Digamber Kamat) यांनी पाठपुरावा केला आहे. हल्लीच पर्वरी येथील सचिवालय संकुलात गोवा जलतरण संघटना, क्रीडा व युवा व्यवहार खाते, गोवा क्रीडा प्राधिकरण यांची संयुक्त आढावा बैठक झाली. त्यामुळे आमदार कामत यांनी राज्यात जलतरण अकादमी सुरू करण्यावर भर दिला. पणजी अथवा मडगाव येथील जलतरण तलाव प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर कोठेही एका ठिकाणी जलतरण अकादमी सुरू करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत कामत यांनी व्यक्त केले. देशातील विविध अकादमी अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून या अकादमींकडून गोव्यातील जलतरणपटूंना प्राधान्यक्रमाने आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण पद्धतीनुसार व्यावसायिक आणि स्पर्धात्मक मार्गदर्शन करण्याची ग्वाही देण्यात आल्याचे कामत यांनी आढावा बैठकीत नमूद केले. गोव्यातील जलतरण संबंधित विविध सूचना आमदार कामत यांनी बैठकीत मांडल्या, त्यावर तोडगा काढण्याचे आणि समस्या निवारण करण्याचे आश्वासन क्रीडा संचालक वसंत प्रभुदेसाई यांनी दिले.

राज्य जलतरणविषयक मुद्दे

- फोंडा येथील जलतरण तलावासाठी अखंडित रासायनिक पुरवठा आवश्यक असल्याची आमदार दिगंबर कामत यांची मागणी, सूरळीत पुरवठ्याचे खात्याकडून आश्वासन

- जलतरणपटूंच्या आरोग्याच्या अनुषंगाने जलतरण तलावाची नियमित निगराणी आवश्यक असल्याचे आमदार कामत यांचे मत, जेणेकरून जलतरणपटूंना त्वचा आणि कानविषयक आरोग्यसमस्या उदभवणार नाहीत

- दीर्घकाळ बंद असलेल्या मडगाव जलतरण तलावासंदर्भात उपस्थित प्रश्नावर संबंधित कामासाठी निविदा आणि कंत्राटदार नियुक्ती प्रक्रिया सुरू झाल्याची माहीती

- आमदार कामत यांच्याकडून पणजी जलतरण तलावाच्या कामासाठी नव्या कंत्राटदार नियुक्तीसंदर्भात विचारणा, संबंधित काम सुरू झाल्याची खात्याकडून माहिती

- गोव्यात जलतरणातील अफाट गुणवत्ता असल्याने शालेय पातळीवर गुणवत्ता शोध योजना आवश्यक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: बुध अन् शुक्राचे महागोचर! 11 जूनला पालटणार 3 राशींचं नशीब; गुंतवणुकीतून मिळणार दुप्पट परतावा

खरी कुजबुज: मनोज उत्तर कर्नाटक संघर्ष सेनेच्‍या संपर्कात

Goa Politics: आमदार वीरेश बोरकर मांडणार भूमिका? पक्षातील अंतर्गत वाद आणि मनोज परब यांच्‍याबाबत काय बोलणार?

Pakistan Bus Accident: एक्सप्रेसवेवर काळाचा थरार, दोन बसेसची जोरदार धडक! पाकिस्तानात भीषण अपघात; 17 प्रवाशांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

Vaibhav Sooryavanshi: 50 चेंडूंचे चॅलेंज 25 चेंडूंतच संपवले! वैभव सूर्यवंशीचे मैदानावर वादळ, ठोकलं शानदार शतक Watch Video

SCROLL FOR NEXT