Goa Cricket Team Wins Colonel CK Naidu Trophy Cricket Tournament Dainik Gomantak
क्रीडा

गोवा क्रिकेट संघाने मारली मजल, दीपराजचे शतक

दीपराजची फलंदाजी करताना चौफेर फटकेबाजी

दैनिक गोमन्तक

पणजी : दीपराज गावकरने कर्णधारास साजेशी खेळी करत संघाला संकटातून सावरले. त्याच्या खणखणीत शतकाच्या (114) जोरावर कर्नल सी. के. नायडू करंडक (25वर्षांखालील) क्रिकेट (Cricket) सामन्याच्या पहिल्या दिवशी गोव्याला सावरता आले.

अळूर-बंगळूर येथे सुरू असलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर मंगळवारी गोव्याने पहिल्या डावात 6 बाद 296 धावा अशी समाधानकारक मजल मारली. दीपराजला दमदार साथ दिलेला सोहम पानवलकर नाबाद 51 धावांवर नाबाद आहे. त्याने व दीपराजने सहाव्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली. त्यापूर्वी दीपराजने तुनीष सावकारसह पाचव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी करून 4 बाद 81 वरून गोव्याच्या डावाला मजबूती दिली.

दीपराजने मंगळवारी चमकदार फलंदाजी करताना चौफेर फटकेबाजी केली. दिवसातील 4.5 षटके बाकी असताना त्याची झुंजार खेळी संपुष्टात आली. बासिल याने त्याला पायचीत बाद केले. दीपराजने चार उत्तुंग षटकार व 14 चौकारांच्या मदतीने 185 चेंडूंत 114 धावा केल्या. दीपराजला तुनीषने (30) चांगली साथ दिली, त्यामुळे गोव्याला (goa) लवकर गुंडाळणे केरळला (Kerala) शक्य झाले. दिवसअखेर नाबाद असलेल्या सोहमने 110 चेंडूंचा सामना करताना सात चौकार व एक षटकार मारला.

चांगल्या सुरवातीनंतर घसरगुंडी

केरळने मंगळवारी सकाळी नाणेफेक जिंकून गोव्यास फलंदाजीस पाचारण केले. सकारात्मक सुरवात करताना ईशान गडेकर (21) व वैभव गोवेकर (37) यांनी गोव्याला 48 धावांची सलामी दिली. मात्र 20 धावांत तीन विकेट गमावल्यामुळे गोव्याची घसरगुंडी उडाली. श्रीहरी नायर याने ईशानला बाद करून सलामीची जोडी फोडली. नंतर दोन धावांच्या फरकाने अखिल स्कारिया याने वैभव व मंथन खुटकर (10) यांना बाद करून गोव्याच्या संकटात वाढ केली. नंतर श्रीहरीच्या गोलंदाजीवर विश्वंबर काहलोन (8) यष्टिचीत बाद झाल्यामुळे गोव्याच्या गोटात चिंता वाढली.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः 90 षटकांत 6 बाद 296 (ईशान गडेकर 21, वैभव गोवेकर 37, मंथन खुटकर 10, विश्वंबर काहलोन 8, दीपराज गावकर 114, तुनीष सावकार 30, सोहम पानवलकर नाबाद 51, मोहित रेडकर नाबाद 20, एनपी बासिल 1-71, अखिल स्कारिया 2-36, श्रीहरी नायर 2-73, अब्दुल बाझिथ 1-48).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT