GCA Secretary Rohan Desai Dainik Gomantak
क्रीडा

GCA Secretary Rohan Desai: 'बीसीसीआय'च्या दक्षिण विभाग निमंत्रकपदी गोवा क्रिकेट असोसिएशनचे रोहन देसाई बिनविरोध

2023-24 क्रिकेट मोसम; दुलिप, देवधर करंडक संघ निवड बैठकीचेही प्रमुख

किशोर पेटकर

Goa Cricket Association's Secretary Rohan Desai: दक्षिण विभागीय क्रिकेट संघटनांच्या 2023-24 मोसमासाठी गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) सचिव रोहन गावस देसाई यांची निमंत्रकपदी बिनविरोध नियुक्ती झाली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) स्पर्धांसाठी दक्षिण विभागीय संघ निवडण्याची जबाबदारी यंदा ‘जीसीए’कडे असेल.

दक्षिण विभागीय निमंत्रकपदी नियुक्ती झाल्याबद्दल ‘जीसीए’ व्यवस्थापकीय समितीने रोहन यांचे अभिनंदन केले आहे. आगामी दुलिप करंडक, तसेच प्रा. देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण विभागीय संघ निवड समितीची बैठक रोहन यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

याशिवाय 14 वर्षांखालील दक्षिण विभागीय स्पर्धा केंद्र ठरविण्याची जबाबदारीही ‘जीसीए’वर असेल. दक्षिण विभाग क्रिकेट संघटनांची आभासी पद्धतीने बैठक झाली, त्यावेळी रोहन यांच्या निवडीवर एकमताने शिक्कामोर्तब झाले.

दक्षिण विभागात गोव्यासह कर्नाटक, हैदराबाद, आंध्र, तमिळनाडू, केरळ व पुदुचेरी या क्रिकेट संघटनांचा समावेश आहे.

दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धा 28 जून ते 16 जुलै या कालावधीत, तर देवधर करंडक एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा 24 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत खेळली जाईल. या दोन्ही स्पर्धेत मध्य, दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम व ईशान्य असे सहा संघ सहभागी होतील.

त्यापैकी दक्षिण विभागीय संघ निवडण्यासाठी बैठक बोलावण्याचा अधिकार रोहन यांच्याकडे असेल. गतवर्षीच्या दुलिप करंडक स्पर्धेत दक्षिण विभाग संघ उपविजेता ठरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Updates: वाळपई विठ्ठलमय

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

Mhadei River: ‘पिण्यासाठी पाणी’ हे कर्नाटकचे नाटक! ‘म्हादई’ तिन्ही राज्यांसाठी महत्त्वाची; कॅप्टन धोंड यांचे प्रतिपादन

School Bag Weight: ..विद्यार्थ्यांचा खांद्यावर दप्तराचे 'वाढते' ओझे! केंद्राच्‍या निर्णयाकडे गोव्याची पाठ; परिपत्रकाला ‘केराची टोपली’

SCROLL FOR NEXT