Goa Chess Player Nitish Belurkar Dainik Gomantak
क्रीडा

Blitz Chess Tournament : नीतिश बेलुरकरला लॅटव्हियात उपविजेतेपद; 11 फेऱ्यांतून साडेनऊ गुणांची कमाई

स्पर्धेत 29 देशांतील 152 बुद्धिबळपटूंनी भाग घेतला होता

किशोर पेटकर

Goa Chess Player Nitish Belurkar : गोमंतकीय इंटरनॅशनल मास्टर (आयएम) बुद्धिबळपटू नीतिश बेलुरकर याला लॅटव्हियातील रिगा टेक्निकल युनिव्हर्सिटी ओपन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले. अकरा फेऱ्यांच्या या स्पर्धेत त्याने साडेनऊ गुणांची कमाई केली.

स्पर्धेत २९ देशांतील १५२ बुद्धिबळपटूंनी भाग घेतला होता. नीतिशचे सध्या २३५२ एलो गुण आहेत. २५५५ परफॉर्मन्स रेटिंगसह त्याने लॅटव्हियातील स्पर्धेत चमकदार खेळ केला. या कामगिरीने त्याने ५६.४ मानांकन गुणांचीही कमाई केली.

जॉर्जियन ग्रँडमास्टर बादूर जोवोव्हा याने साडेदहा गुणांसह स्पर्धेत विजेतेपद पटकावले. रौप्यपदक विजेत्या नीतिशनंतर लिथुआनियाचा ग्रँडमास्टर पॉलियस पुल्तिनेव्हिसियस याला नऊ गुणांसह तिसरा क्रमांक मिळाला.

उपविजेतेपदाच्या वाटचालीत नीतिशने प्रमुख खेळाडूंत नॉर्वेचा आयएम एल्हम अब्द्रलौफ, जपानी कँडिडेट मास्टर ट्राम थान्ह तू यांना नमविले, तर विजेता जोबोव्हा याला बरोबरीत रोखले. नीतिश आता रिगा टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत खेळेल आणि नंतर अबुधाबी मास्टर्समध्ये सहभागी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: स्टंट, म्युझीक आणि बरंच काही... गोव्यात होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बाईक इव्हेंटचे वेळापत्रक प्रसिद्ध

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT