Goa Girls Lagori Team  Dainik Gomantak
क्रीडा

Lagori Championship: गोव्याच्या पुरुष लगोरी संघाचे राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक, तर महिलांना ब्राँझपदक

पुरुष संघाची अंतिम लढतीत निसटती हार

किशोर पेटकर

Senior National Lagori Championship At Haryana: गोव्याच्या पुरुष लगोरी संघाने राष्ट्रीय सीनियर स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली, तर महिलांना ब्राँझपदक मिळाले.

हरियानात झालेल्या या स्पर्धेत पुरुष गटातील अंतिम लढतीत गोव्याला महाराष्ट्राकडून १-२ सेट्स फरकाने निसटती हार पत्करावी लागली. यंदा स्पर्धेची दहावी आवृत्ती होती.

Goa Boys Lagori Team

साखळी फेरीत ओळीने पाच सामने जिंकल्यानंतर गोव्याच्या पुरुष संघाने उपांत्यपूर्व लढतीत राजस्थानला २-१ असे नमविले, तर उपांत्य लढतीत आसामला २-० असे नमवून उपांत्य फेरी गाठली.

पुरुष गटात महाराष्ट्राला सुवर्ण, गोव्याला रौप्य, तर आसाम व पुदुचेरीस ब्राँझपदक विभागून मिळाले.

महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत बिहारला २-१ असे पराजित केल्यानंतर त्यांना उपांत्य लढतीत आसामकडून १-२ फरकाने पराभव पत्करावा लागला. या गटात हरियानाला सुवर्ण, तर आसामला रौप्यपदक मिळाले. गोवा व झारखंडला संयुक्तपणे ब्राँझपदक मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! मिथुन, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींना करिअरमध्ये मोठे यश, वाचा तुमचे भविष्य

Goa Live News: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी; वेर्णा येथे झाला अपघात

Tilak Varma: आशिया कपमध्ये कमाल, आता तिलक वर्मा करणार कॅप्टन्सी! टीमची झाली घोषणा; पाहा संपूर्ण संघ

BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

SCROLL FOR NEXT