badminton association 
क्रीडा

गोवा बॅडमिंटन संघटना बिनविरोध

किशोर पेटकर

पणजी

गोवा बॅडमिंटन संघटनेची २०२०-२४ कालावधीसाठी व्यवस्थापकीय समिती बिनविरोध ठरणार आहे. समितीच्या सर्व पदासाठी निवडणूक टळली असून निवडीवर १६ ऑगस्ट रोजी संघटनेच्या आमसभेत शिक्कामोर्तब होईल. अध्यक्षपदी नरहर ठाकूर, सचिवपदी संदीप हेबळे व खजिनदारपदी सर्फराज शेख यांची फेरनियुक्ती असेल.

संघटनेच्या १६ सदस्यीय व्यवस्थापकीय समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. पणजी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष मनोज पाटील निवडणूक अधिकारी असून आज शेवटच्या दिवशी त्यांच्याकडे १६ जागांसाठी तेवढेच अर्ज सादर करण्यात आले. त्यामुळे कार्यकारिणीची निवड बिनविरोध असेल.

मावळत्या व्यवस्थापकीय समितीतील १३ सदस्य आणखी एका कालावधीसाठी कार्यकारिणीवर असतील. अध्यक्षपदासाठी नरहर ठाकूर, सचिवपदासाठी संदीप हेबळे, खजिनदारपदासाठी सर्फराज शेख, चार उपाध्यक्षपदांसाठी अनिल पैंगीणकर, गौरीश धोंड, पीटर तेलिस व संदीप खांडेपारकर, संयुक्त सचिवपदासाठी वामन फळारी, तर संयुक्त खजिनदारपदासाठी लुसियान सुवारिस यांचे अर्ज दाखल झाले. सात सदस्यपदासाठी आग्नेल दा कुन्हा, डार्विन बार्रेटो, दीपक मयेकर, नीलेश नायक, पराग चौहान, संजय भोबे व वेन फर्नांडिस यांचे अर्ज आहेत.

नव्या व्यवस्थापकीय समितीत दीपक मयेकर, संजय भोबे, वेन फर्नांडिस व डार्विन बार्रेटो हे नवे चेहरे असतील. व्यवस्थापकीय समिती पदासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जांची १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता छाननी होईल. संघटनेची आमसभा १६ रोजी खांडेपार येथे होईल.

संपादन- अवित बगळे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT