Goa Badminton Award Function. Dainik Gomantak
क्रीडा

Goa Badminton : अनुरा, आशुतोष सन्मानित

Goa Badminton : तनिशा क्रास्टो, संध्या मेलाशीमी यांची समारंभास अनुपस्थिती

दैनिक गोमन्तक

पणजीः जागतिक रॅकेटलॉन विजेता, गोव्याचा माजी बॅडमिंटनपटू आशुतोष पेडणेकर, राज्याची अव्वल महिला बॅडमिंटनपटू अनुरा प्रभुदेसाई यांचा गोवा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे (Goa Badminton Association) वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात (Annual Award Function) सन्मान करण्यात आला. यावेळच्या समारंभाचे यजमानपद खांडेपार येथील एसआरके फार्म्स येथे फोंडा शटलर्स यांनी भूषविले. भारतीय संघात निवड झालेली तनिशा क्रास्टो, राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेतील तिहेरी किताब विजेती संध्या मेलाशीमी यांना समारंभास उपस्थित राहता आले नाही. गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या प्रकल्प अधिकारी मोनिका दोरादो, गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष नरहर ठाकूर, सचिव संदीप हेबळे, फोंडा शटलर्सचे अध्यक्ष अनिल पैंगीणकर, सचिव संदीप खांडेपारकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले.

पुरस्कारप्राप्त बॅडमिंटनपटू ः आंतरराष्ट्रीय कामगिरी ः तनिशा क्रास्टो, अनुरा प्रभुदेसाई, प्रांजल चिमुलकर, संध्या मेलाशीमी, आशुतोष पेडणेकर, लिडिया बार्रेटो, अर्जुन फळारी, अनुष्का कुवेलकर, अंजना कुमारी. राष्ट्रीय-राज्यस्तरीय कामगिरी ः डॉ. सिक्लेटिका रिबेलो, डॉ. सतीश कुडचडकर, संदीप कांजी, कमलेश कांजी, अमित कक्कर, विशाल वेर्णेकर, तेजन फळारी, आश्रुन गौतम, हर्ष माने, यश देसाई, सुशील नायक, विल्फ्रेड जॅकिस, शौर्य जोशी, रुद्र दुकळे. प्रवर्तक, प्रशिक्षक, अधिकारी, आयोजक ः रिचर्ड डिसोझा, अशोक मेनन, व्हिक्टर वाझ, नीलेश नायक, संदीप खांडेपारकर, सेल्विन गुदिन्हो, चेतन कवळेकर, आल्बर्ट दोरादो, अविता बांदोडकर, इफ्तिकार शेख, सादिक अत्तार, अभिषेक स्वामी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

SCROLL FOR NEXT