ट्राय गोवाच्या 200 किलोमीटर सायकल राईडमध्ये यशस्वी ठरलेल्या महिला सायकलपटू (Goa) Dainik Gomantak
क्रीडा

Goa: सायकलिंगमध्ये सोळा महिलांसह 96 जण यशस्वी

यशस्वी सायकलपटूंना फ्रान्समधील ऑडॅ क्लब पॅरिसियन यांच्यातर्फे खास पदक

Dainik Gomantak

पणजी: ट्राय गोवा (Try Goa) यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या 200 किलोमीटर बीआरएम सायकल राईडमध्ये (BRM Cycle Ride) 16 महिलांसह एकूण 96 जणांनी निर्धारित वेळेत अंतर पूर्ण केले. सायकल राईडमध्ये गोव्यासह (Goa) बेळगाव (Belgaum), बंगळूर (Bengaluru) येथील सायकल रायडर (Cycle Rider) सहभागी झाले होते. पणजी येथे रविवारी सकाळी सहा वाजता सायकल रायडरनी कूच केले.

धारबांदोडा, मोले, उगे, नेत्रावळी, केपे, लोटली येथून पुन्हा पणजी हे अंतर साडेतेरा तासांत पूर्ण करणे बंधनकारक होते. सर्व यशस्वी सायकलपटूंना फ्रान्समधील ऑडॅ क्लब पॅरिसियन यांच्यातर्फे खास पदक दिले जाईल, अशी माहिती ट्राय गोवाचे राजेश मल्होत्रा यांनी दिली. ऑडॅ राईडचे यंदा शतकमहोत्सव असल्याने जगभरात 200 किलोमीटर सायकल राईड घेण्यात येत आहे. गोव्यातील टप्प्यास साहसी सायकलपटू वेणूवर्धन रेड्डी यांनी सुरवात केली. 200 किलोमीटरसह 100 किलोमीटर सायकल राईड पणजी ते धारबांदोडा व परत या मार्गावर झाली. त्यात 19 सायकलपटू यशस्वी ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT