Glenn McGrath | Cameron Green Dainik Gomantak
क्रीडा

Shubman Gill Catch: 'भारताने तो कॅच घेतला असता, तरी...', गिलच्या वादग्रस्त विकेटवर मॅकग्राचे मोठे विधान

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमधील शुभमन गिलच्या वादग्रस्त कॅचबद्दल दिग्गज ग्लेन मॅकग्राने प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Glenn McGrath opened up on Shubman Gill Catch Controversy: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने भारतीय क्रिकेट संघाला कसोटी चॅम्पियनशीप २०२१-२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अखेरच्या दिवशी (रविवार, ११ जून) २०९ धावांनी पराभूत केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने विजेकेपदालाही गवसणी घातली. दरम्यान, या सामन्यात शुभमन गिलच्या झेलची चांगलीच चर्चा झाली.

भारताच्या दुसऱ्या डावात कॅमेरॉन ग्रीनने गिलचा घेतलेला झेल योग्य होता की अयोग्य याबाबत क्रिकेट विश्वात चर्चा झाल्या. याबद्दल अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली. आता यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राचाही समावेश झाला आहे. त्यानेही त्याचे मत मांडताना म्हटले जो निर्णय घेण्यात आला, त्यामुळे चांगले वाटले.

नक्की काय झाले होते?

सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरले होते. पण 8 व्या षटकात स्कॉट बोलंडने गिलला 18 धावांवर बाद केले. त्याचा कॅमेरॉन ग्रीनने गलीच्या क्षेत्रात झेल घेतला.

पण हा झेल ग्रीनने चेंडू खूप खाली झेलला होता. त्यामुळे चेंडू जमीनीवर लागला आहे की नाही, यावर चर्चा सुरू झाल्या. पण तिसऱ्या पंच रिचर्ड केटलबोरो यांनी ग्रीनचा झेल योग्य ठरवत गिलला बाद दिल्याने त्याला 18 धावांवर माघारी परतावे लागले.

दरम्यान, तिसऱ्या पंचांच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यात भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागचाही समावेश आहे.

मॅकग्रा काय म्हणला?

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार मॅकग्रा या झेलाबद्दल म्हणाला, 'मला वाटते अशा झेलानंतर बऱ्याचदा बाद दिले जाते. आपण याला नाबाद देण्याचा मार्ग शोधत असू, तर मी विरुद्ध बाजूला जाईल. त्यामुळे मी आनंदी आहे. जर हा झेल भारतीय संघाने घेतला असता, तरी मी आनंदीच असतो. मी फक्त ऑस्ट्रेलियन दृष्टीकोनातून सांगत नाही, तर तो ज्याप्रकारे घेतला गेला, त्यानुसार बोलत आहे.'

गिलवर आयसीसीने केली कारवाई

दरम्यान, तिसऱ्या पंचांनी दिलेला झेलबादचा निर्णय गिलला पटला नव्हता. त्याने त्याची निराशा चौथ्या दिवसाच्या खेळानंतर सोशल मीडियावर स्पष्टपणे जाहीर केली. त्याने ग्रीन झेल घेत असतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना भिंगाचे इमोजी कॅप्शनमध्ये टाकले होते.

गिलने केलेल्या याच चूकीमुळे त्याला आयसीसीकडून कारवाईला सामोरे जावे लागले आहे. गिलवर या चूकीसाठी सामना शुल्काच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे गिलवर या सामन्यानंतर एकूण 115 टक्के दंड लागला.

कारण भारतीय संघाच्या खेळाडूंवर आधीच आयसीसीने षटकांची गती कमी राखल्याने सामना शुल्काच्या 100 टक्के दंड लावला होता. त्यामुळे त्याला त्याच्या शिक्षेचा भाग म्हणून पैसे भरावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT