Jasprit Bumrah | Glenn McGrath Dainik Gomantak
क्रीडा

Jasprit Bumrah: 'मी त्याचा फॅन, पण बॉलिंग ऍक्शन...' बुमराहला दिग्गज मॅकग्राचा पुनरागमनापूर्वी मोलाचा सल्ला

Glenn McGrath advice to Jasprit Bumrah: दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राने जसप्रीत बुमराहबद्दल भारताकडून पुनरागमन करण्याआधी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Glenn McGrath advice to Jasprit Bumrah:

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या 10 महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघातून दूर आहे. त्याला दुखापतींमुळे गेल्या वर्षभरात फारसे क्रिकेट खेळता आलेले नाही. त्याला टी20 वर्ल्डकप 2022, आयपीएल 2023, कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामना 2023 अशा स्पर्धांना आणि महत्त्वाच्या सामन्यांना मुकावे लागले.

पण आता तो 18 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आयर्लंड दौऱ्यातून पुनरागमन करताना दिसेल. विशेष म्हणजे तो फक्त पुनरागमन करणार नाही, तर भारतीय संघाचे नेतृत्वही करणार आहे. पण असे असले तरी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने त्याला त्याच्या वर्कलोडवर काम करण्याचा सल्ला दिला आहे.

बुमराहने आयपीएल 2023 पूर्वी त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर तो आता सावरला असून पुन्हा भारताकडून मैदानात उतरण्यास सज्ज आहे.

बुमराहबद्दल एमआरएफ पेस फाउंडेशनद्वारे आयोजित एका वेगवान गोलंदाजी शिबिरादरम्यान मॅकग्रा म्हणाला, 'बुमराह भारतासाठी शानदार राहिला आहे. त्याची गोलंदाजी आकडेवारी, त्याने घेतलेल्या विकेट्स आणि तो ज्याप्रकारे गोलंदाजी करतो, मी त्याचा मोठा चाहता आहे.'

'पण त्याची गोलंदाजी शैली त्याच्या शरीरावर खूप जास्त ताण टाकते. त्यामुळे त्याला मजबूत आणि तंदुरुस्त राहाणे महत्त्वाचे आहे. त्याने जर हे केले, तर तो आणखी काही वर्षे भारतासाठी खेळू शकतो.'

'सध्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक आणि आयपीएल पाहाता वेगवान गोलंदाजांसाठी कोणताही ऑफ सिजन नसतो. विशेषत: जसप्रीत बुमराहसारख्या गोलंदाजांसाठी पुन्हा ताकद मिळवण्यासाठी ऑफ सिजन गरजेचा असतो. त्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे, तो त्यालाच घ्यायचा आहे.'

'तिन्ही प्रकारात खेळणे हे कठीण झाले आहे. ही अशी गोष्ट आहे, ज्याचा जसप्रीतला पुढे जाताना विचार करावा लागणार आहे. कारण तो वेगवा आहे आणि तो त्याच्या शरीराबाबत थोडा कठोर आहे. मला वाटते की त्याच्या उर्वरित कारकिर्दीतही अजून खूप काही देऊ शकतो.'

याशिवाय मॅकग्रा यांनी यावरही लक्ष वेधले की सध्याच्या काळात खूप क्रिकेट खेळले जाते. तो म्हणाला, 'सध्याच्या काळात खूप क्रिकेट खेळले जाते. त्यामुळे शरीरावर अधिक ताण येतो. पण तुम्हाला त्यातून कसे बाहेर यायचे आणि पुन्हा शरीराची ताकद कशी मिळवायची हे माहिती हवे.'

'जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि कर्टनी वॉल्श यांसारखे खेळाडू खूप वर्षे क्रिकेट खेळले कारण त्यांना त्यांच्या शरीराची काळजी कशी घ्यायची हे माहिती आहे. मी माझ्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आणि माझी शैली सोपी होती, ज्यामुळे दुखापतीनंतर पुनरागमन सोपे होते.'

बुमराहने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 25 सप्टेंबर 2022 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेत खेळला होता. त्यानंतर आता तो आयर्लंड दौऱ्यात खेळताना दिसणार आहे.

दरम्यान, या दौऱ्यात बुमराहच्या कामगिरीकडे लक्ष राहाणार आहे. जर त्याचे पुनरागमन यशस्वी राहिले, तर भारतासाठी आगामी आशिया चषक 2023 आणि वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी ही आनंदाची बाब असेल.

बुमराहची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

जसप्रीत बुमराहने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आत्तापर्यंत कसोटीत 30 सामन्यांत 128 विकेट्स घेतल्या. तसेच 72 वनडे सामन्यात 121 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 60 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 70 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT