Gary Ballance Announces Retirement Dainik Gomantak
क्रीडा

Gary Ballance Retires: दोन देशांसाठी शतक झळकावून इतिहास रचणाऱ्या क्रिकेटपटूने अचानक घेतला निवृत्तीचा निर्णय

Gary Ballance Announces Retirement: यॉर्कशायर आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू गॅरी बॅलन्सने निवृत्ती जाहीर केली आहे.

Manish Jadhav

Gary Ballance Announces Retirement: यॉर्कशायर आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू गॅरी बॅलन्सने निवृत्ती जाहीर केली आहे. बॅलेन्सने नुकतेच झिम्बाब्वेकडून पुन्हा कारकिर्दीला सुरुवात केली होती.

त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 33 वर्षीय बॅलेन्सने 2014 ते 2017 दरम्यान इंग्लंडकडून 23 कसोटी सामन्यांमध्ये चार शतके झळकावली होती.

दोन देशांसाठी शतक झळकावणारा जगातील दुसरा फलंदाज

काही काळापूर्वी त्याने झिम्बाब्वे (Zimbabwe) क्रिकेटमध्ये पुन्हा प्रवेश केला होता. बॅलेन्सने डिसेंबरमध्ये झिम्बाब्वे क्रिकेटसोबत दोन वर्षांचा करार केला होता. त्याने जानेवारी ते मार्च दरम्यान एकूण 8 सामने खेळले, ज्यामध्ये बुलावायो येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकमेव कसोटीसह त्याने नाबाद 137 धावा केल्या.

7 फेब्रुवारी रोजी, त्याने माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केपलर वेसेल्स यांच्यानंतर दोन वेगवेगळ्या देशांसाठी शतके झळकावून इतिहास रचला होता.

मात्र, गेल्या महिन्यात नेदरलँड्सविरुद्धच्या (Netherlands) वनडे मालिकेत नाबाद 64 धावा केल्यानंतर बॅलेन्सने आता पुन्हा सुरु केलेली कारकीर्द संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

खूप विचार करुन निर्णय घेतला

तो एका निवेदनात म्हणाला - खूप विचार केल्यानंतर, मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याची संधी दिल्याबद्दल आणि त्यांच्या संघात माझे स्वागत केल्याबद्दल मी झिम्बाब्वे क्रिकेटचा नेहमीच ऋणी राहीन.

वंशवादाचे आरोप

मात्र, गेल्या नोव्हेंबरमध्ये त्याच्यावर वर्णद्वेषाचा आरोपही करण्यात आला होता. इंग्लिश क्रिकेटमधील त्याची कारकीर्द वादाच्या भोवऱ्यात संपुष्टात आली.

मानसिक आरोग्याच्या कारणास्तव तो काही महिन्यांपासून रजेवर गेला होते. यॉर्कशायरने 2022 च्या हंगामाच्या शेवटी त्याला त्याच्या करारातून मुक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT