Funny Memes viral after India lost Final against Australia in U19 Cricket World Cup 2024:
ऑस्ट्रेलियाच्या युवा क्रिकेट संघाने रविवारी (11 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. ऑस्ट्रेलियाने रविवारी बेनोनीमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय युवा संघाला 79 धावांनी पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली.
दरम्यान, 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच भारताला पराभूत केले आहे. यापूर्वी 2012 आणि 2018 साली झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते.
तसेच ऑस्ट्रेलियाने 1988, 2002 आणि 2010 नंतर चौथ्यांदा 19 वर्षांखालील वर्ल्डकपवर नाव कोरले.
विशेष म्हणजे गेल्या 9 महिन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत करण्याची ही सलग तिसरी वेळ आहे.
यापूर्वी जून 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीपच्या अंतिम सामन्यातही ऑस्ट्रेलियानेच भारताला पराभूत केले होते, तर नोव्हेंबर 2023 मध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही ऑस्ट्रेलियानेच भारताला पराभवाचा धक्का दिला होता.
त्याचमुळे सध्या सोशल मीडियावर अनेक गमतीशीर मीम्स क्रिकेट चाहत्यांनी शेअर केले आहेत. विविध चित्रपटातील सीन आणि डायलॉग वापरून केलेले मीम्सही व्हायरल होत आहेत.
अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 254 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 43.5 षटकात सर्वबाद 174 धावाच करता आल्या.
भारताकडून आदर्श सिंगने सर्वाधिक 47 धावा केल्या, तसेच मुरुगन अभिषेकने 42 धावा केल्या. मात्र बाकी कोणाला खास काही करता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून महिल बिअर्डमन आणि राफ मॅकमिलन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाकडून हरजस सिंगने सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार ह्यु वेबगेनने 48, ऑलिव्हर पीकने नाबाद 46 आणि हॅरी डिक्सनने 42 धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 7 बाद 253 धावा केल्या.
भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.